ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सिडको लाँजिस्टी पार्क विरोधात भाजपा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभी राहणार – प्रकाश ठाकूर

August 22, 202115:03 PM 18 0 0

उरण(संगिता पवार) सिडको लाँजिस्टीक पार्कला शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध दर्शविला आहे.अशा शेतकऱ्यांच्या पाठीशी भाजपा उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली खंबीर पणे उभी राहणार असा विश्वास भाजपाचे तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर यांनी सिडको बाधित शेतकऱ्यांना दिला आहे.

प्रकाश ठाकूर यांनी माहिती देताना सांगितले की उरण तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी देशाच्या उन्नतीसाठी आपल्या शेत जमीनी अल्प किंमतीत संपादित करुन दिल्या. परंतु आजतागायत सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.आणि आज विकासाचा डंका वाजत असणारी सिडको प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटलांच नाव नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला न देता.प्रकल्पग्रस्ताच्या भावणाशी खेळत धुतूम,जासई,वेश्वी,चिर्ले,दिघोडे ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या घरांना नोटीसी बजावत सिडको लाँजिस्टीक पार्कच्या नावाखाली घरादारावर नांगर फिरवण्याचा घाट घालत असतील तर भाजपा ते कदापी सहन करणार नाही. अशा सिडकोच्या लाँजिस्टीक पार्क विरोधात आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी भाजपा उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली रस़्त्यावर उतरतील असा इशारा प्रकाश ठाकूर यांनी सिडकोला दिला आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *