जालना (प्रतिनिधी) ः ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात भाजपाने जिल्हाभरात विविध ठिकाणी आंदोलन करुन रोष व्यक्त केला. जोरदार घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध करुन आरक्षण देण्याची मागणी केली. यावेळी आंदोलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, शहराध्यक्ष राजेश राऊत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उस्थित होते. तर माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी जालना-नांदेड हायवे रोडवर चक्कजाम आंदोलन केले.
मराठा आरक्षणा पाठोपाठ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्य्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, आज भाजपाकडून राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं जात आहे. दरम्यान, जालन्यात देखील भाजपा जिल्हाध्यक्ष आ. संताष दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष दानवे यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका करीत ओबीसीचे आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही असे म्हटले. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं, मराठा आरक्षण घालवलं, ओबीसी आरक्षण घालवलं, पदोन्नतीतील आरक्षण घालवलं. असा देखील त्यांनी राज्य सरकारवर आरोप केला.
यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, शहराध्यक्ष राजेश राऊत, नारायण चाळगे, सतिष जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात सकाळी 11 वाजेपासून आंदोलनाला सुरुवात झाली होती. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Leave a Reply