*त्यागमूर्ती कृपावंत !*
*दीन दलितांची आई !*
*कीर्तीमान दयावंत !*
*धन्य माता रमाबाई !! १ !!*
*घर चालविण्यासाठी !*
*शेण वेचूनी गोव-या !*
*अन् सरपणासाठी !*
*फिरे वणवण द-र्या !! २ !!*
*हृदयाने ती चांगली !*
*कुलीनता ही मनाची !*
*मनोधैर्य ते शालीन !*
*थोर पवित्र शीलाची !! ३ !!*
*गाडा संसाराचा हाकी !*
*ध्येय बाबासाहेबांचे !*
*पूर्ण करण्या शिक्षण !*
*साथ देई मन वाचे !! ४ !!*
*समजूतदारपणा !*
*मानवता ती उदंड !*
*मनी कारूण्य प्रेरणा !*
*कष्ट केले ते प्रचंड !! ५ !!*
*पाहताच रमाईने !*
*दशा भुकेल्या मुलांची !*
*जेवणाची केली सोय !*
*कनकाच्या बांगड्यांची !! ६ !!*
*अती काबाड कष्टाने !*
*काया होती पोखरली !*
*आत्यंतिक आजाराने !*
*प्राणज्योत मालवली !! ७ !!*
*************************
*✒️ श्रीगणेश शेंडे , भुईंज , सातारा.*
*© भ्रमणध्वनी – 8605139140.*
Leave a Reply