जालना: जालना शहरात सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेल्या कैलास ब्रिगेड या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जालना शहरातील आपुलकी बेघर निवारा केंद्रात असलेले शाम तांबे व माया कांबळे या दृष्टीहीन जोडप्यांच्या माता- पित्यांची जबाबदारी पार पाडीत आम्ही या नेत्रहीन जोडप्यांचा शुक्रवार दिनांक १६ जुलै २०२१ रोजी विवाह लावत असल्याची माहिती या विवाह सोहळयाचे मुख्य संयोजक तथा कैलास ब्रिगेडचे अध्यक्ष अरूण सरदार यांनी दिली.
या विवाह सोहळ्याबाबत बोलतांना अरूण सरदार म्हणाले की, कैलास ब्रिगेड ही सामाजिक संस्था गेल्या पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे, विविध सामाजिक उपक्रम राबविणारी ही संस्था जालना शहरातील रेल्वे स्थानक मार्गावर आपुलकी बेघर निवारा केंद्र चालवून बेघरांना आधार देण्याचे कार्य करीत आहे. या आपुलकी बेघर निवारा केंद्राच्या माध्यमातून आम्ही बेघरांची काळजी घेतो. घरातून रागाच्याभरात निघून आलेल्या वृध्द व्यक्तींना आपुलकीने वागणूक देवून त्यांची काळजी घेतली जाते. या बेघर निवारा केंद्रात २४जून २०२१ रोजी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील तांबारातूरी येथील शाम बाबा तांबे हा ३८ वर्षीय दृष्टीहीन तरूण दाखल झाला. गायनाचा छंद असलेल्या शाम तांबे हा उत्तम हस्तकलाकारही आहे. तांबे हा आपुलकी बेघर निवारा केंद्रात दाखल झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील व बारामती तालुक्यातील खांडच येथील माया महादेव कांबळे ही ३६ वर्षीय बेघर दृष्टीहीन तरूणी आपुलकी बेघर निवारा केंद्रात दिनांक ३० जून रोजी दाखल झाली. आमच्या आपुलकी परिवाराने या दृष्टीहीन जोडप्यांचा आगळावेगळा विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला. आमदार कैलास गोरंट्याल यांनी या नेत्रहीन जोडप्यांच्या विवाहासाठी मोलाचे सहकार्य केले. आम्ही या दृष्टीहीन जोडप्यांच्या विवाहासाठी पालकत्व स्वीकारण्याबाबत आवाहनही केले होते. या आवाहनास जालना शहरातील सामाजिक संस्थांनी प्रतिसाद देवून मदतीचे हात पुढे केले.यामुळेच आम्ही शाम तांबे व माया कांबळे या दृष्टीहीन जोडप्यांचा शुक्रवार दिनांक १६ जुलै २०२१ रोजी विवाह लावून देत आहोत.
आपुलकी बेघर निवारा केंद्रात हा आगळा वेगळा विवाह सोहळा सकाळी ११.३० वाजता होणार असून जालना शहराचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या विवाह सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून
नगराध्यक्ष सौ. संगिताताई गोरंट्याल, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, नगर पालिका विभागाचे प्रकल्प अधिकारी राहूल सूर्यवंशी, नगर पालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, विशेष समाज कल्याण आयुक्त अमित घवले, पोलीस प्रशिक्षण विद्यालयाचे प्राचार्य अभय डोंगरे, ग्रामविकास विभागाचे अव्वर सचिव संतोष कराड, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक संग्राम ताठे, एन. यू. एल. एमचे अभियान व्यवस्थापक विजय सांगळे, पांडुरंग डाके, जालना शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक महावीर ढक्का, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश टाक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल कंकाळ,डॉ.रविंद्र देशमुख, जालना येथील उद्योजक अजहर घांची आदी उपस्थित राहणार आहेत.
शहरातील प्रतिष्ठित नागरीक , सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आदींच्या साक्षीने आयोजित हा अनोखा विवाह सोहळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कैलास ब्रिगेडच्या सचिव वैशाली सरदार तसेच सुधीर श्रीसुंदर, संजय खरात, अलका झाल्टे, संजय सोनवणे, राजेंद्र ठोंबरे, प्रदीप मघाडे, विनोद भगत, राजेश ओ. राऊत , महेंद्र रत्नपारखे, अंजना सोनवलकर, मंगेश कामे, अमोल सरोदे, आकाश हंडे, शर्वरी सरदार, राजरत्न गवई, रत्नाकर लांडगे, वनिता पिंपळे, लोकेश झाडीवाले,विशाल देशपांडे, आकाश पवार, सागर मुंदडा, सोनल झाल्टे, रोहीत काकडे, ओंकार झाल्टे, अमित कांबळे, सिध्दार्थ इंगळे, सागर कदम, सुनील साळवे, बोधीपाल ढिगारा, सोनल झाल्टे आदी परिश्रम घेत आहेत.
Leave a Reply