जालना (प्रतिनिधी) भाजपाच्या केंद्र सरकारने शेतकर्याविरूद्ध तीन काळे कायदे केले आहेत. हे कायदे मागे घेण्यासाठी गेल्या अनेक महिण्यापासून सातत्याने आंदोलने उभारली गेली. परंतू केंद्र सरकारने कोणतेच पाऊल उचलले नाही. परिणामी देशातील शेतकर्यांनी दिल्ली येथे या काळ्या कायद्याविरोधात देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले होते या आंदोलनाला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मामा चौक येथे रस्ता रोको आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करत केंद्र शासनाचा निषेध केला.
याप्रसंगी दिपक डोके म्हणाले की, शेतकर्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या या काळ्या कायद्यांना तात्काळ रद्द करण्यात यावे. तसेच अॅड. बाळासाहेब अंबेडकर यांच्या आदेशानुसार आपण वारंवार शेतकर्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करू असे त्यांनी यावेळी सांगीतले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, अॅड. अशोक खरात, अकबर इनामदार, दीपक घोरपडे, अॅड. कैलास रत्नपारखे, अकबर इनामदार, मुकुल निकाळजे, शेख लालाभाई, राहुल भालेराव, किशोर जाधव, राजेंद्र खरात, प्रा. संतोष आढाव, गौतम वाघमारे, अमोल लोखंडे, मैनाबाई खंडागळे, सुरज सोनवणे, बाबूराव हजारे, विलास नरवडे, सुनील मगरे, अमोल कातुरे, सुनील सदाफुले, सुनील वाहुळे, संतोष मगर, शरद वाघमारे, रामु खरात, बबन हिवाळे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply