ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अश्विन पाटील मित्र परिवार वतीने रक्तदान शिबीर संपन्न १५० रक्तदात्यांनी केले रक्तदान

July 31, 202113:32 PM 76 0 0

उरण (संगिता पवार )
उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय अश्विन पाटील यांच्या वाढदिवस निमित्त अश्विन पाटील मित्र परिवार यांच्या वतीने उरण येथील उरण नगरपरिषदेचे विमला तलाव ,बाळासाहेब क्रीडा संकुल येथे शुक्रवार (दि. ३० ) जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .सुमारे १५० रक्तदात्यांनी रक्तदान केले .

यंदाचे पहिले वर्ष होते .श्री साई ब्लड बँक पनवेल यांचे सहकार्य मिळाले .
आमदार महेश बालदी , भाजपा उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर , भाजपा उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह रायगड जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर ,पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर , नरेश रहाळकर ,संतोष पवार , डॉ .सत्या ठाकरे .आदी उपस्थित राहुन आयोजकांचे अभिनंदन केले ..
डॉ .सत्या ठाकरे यांनी उपस्थित राहुन रक्तदान केले रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी तुषार पाटील ,गणेश पाटील ,मिलिंद पाटील ,दर्शन पाटील ,सिद्धार्थ मसुरकर , पपू सूर्यराव ,प्रवीण पाटील ,मयुरेश पाटील ,अंकिता म्हात्रे ,ॠषांली पाटील ,कौशिक भोईर ,राकेश भोईर ,किरण घरत , दिनेश चव्हाण ,सागर मानकामे ,वैभव तांडेल ,चंदन भगत ,आदींचे सहकार्य मिळाल रक्तदान शिबिराचे यंदाचे पहिले वर्ष आहे , महाड -पोलादपूर येथील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे लवकरच वाटप करण्यात येणार आहे . पुढील काळात अश्विन पाटील मित्र परिवार भेंडखळ च्या वतीने चांगले उपक्रम आम्ही राबविणार आहोत .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *