जालना ( प्रतिनिधी) : कोरोना चे संकट आटोक्यात येत असतांना राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असल्याने रक्त संकलन वाढवावे असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले होते. त्या अनुषंगाने युवा सेना प्रमुख ना. आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवा सेनेच्या वतीने जालन्यात महा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती युवा सेना राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर यांनी दिली.
अधिक माहिती देतांना अभिमन्यू खोतकर म्हणाले, कोरोना संक्रमण काळ गडद असतांना युवा सेनेच्या वतीने रक्तदानाचा महायज्ञ यशस्वी करण्यात आला. आता पुन्हा रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनास प्रतिसाद देण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला असून सोमवारी ( ता. ०७) राज्यभरात विधानसभा निहाय रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात आली आहे . जालना शहरात भाग्यनगर परिसरातील माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या संपर्क कार्यालयात सकाळी १०.०० वा. महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून युवा सेना पदाधिकारी, रक्तदाते व युवा सैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून रक्त संकलनास हातभार लावावा. असे आवाहन युवा सेना राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर,शिवसेना तालुका प्रमुख संतोष मोहिते, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, अंकुश पाचफुले, उपजिल्हा प्रमुख अमोल ठाकूर, यांनी केले आहे.
Leave a Reply