ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित भव्य शिबीरात ८१ जणांचे रक्तदान; १४० जणांची आरोग्य तपासणी, ४१ जणांचे लसीकरण

December 21, 202113:11 PM 39 0 0

जालना/प्रतिनिधी : राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या ६५ व्या पुण्यतिथीनिमित्त डेबुजी परीट समाज आणि गुरू शिष्य परिवाराच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवारी (दि.२०) जालना येथे भव्य रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर आणि कोवीड लसीकरण शिबीर घेण्यात आले. या उपक्रमांना समाजबांधवांसह गुरूशिष्य परिवाराकडून त्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात ८१ जणांनी रक्तदान करून मानवतावादी कार्यास मोठा हातभार लावला.

संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी डेबुजी परीट समाज आणि गुरू शिष्य परिवाराच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर घेतले जाते. या उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळतो. यंदाही या उपक्रमास अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. शिबीराच्या प्रारंभी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्यार्न रक्तदान शिबीर, जिल्हा स्त्री व बाल रूग्णालयाच्या सहकार्याने आरोग्य तपासणी व कोवीड लसीकरण शिबीर घेण्यात आले. या कार्यक्रमात सौ. मिना वाघमारे, कैलास वाघमारे, सौ. रेखा पैठणकर, रमेश पैठणकर यांनी सलग चौथ्यांना सपत्नीक तर जालना पिपल्स बॅँकेचे संचालक सुभाष वाघमारे यांनी शंभराव्यांदा रक्तदान केले. याशिवाय आयोजित आरोग्य तपासणी शिबीरात १४० जणांची तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले तर ४१ जणांचे लसीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजातील ज्येष्ठ हिरालाल इंगळे, गणेश इंगळे, किशोर खंडाळे,किशोर आगळे, काशीनाथ मेव्हणकर, शंकर काळे, डेबुजी समितीचे अध्यक्ष दुर्गेश मोरे, प्रतिक आगळे, रोषण इंगळे, विजय दळवी, सचिन शिंदे, मनिष जाधव, दिपक इंगळे, सचिन शेलार, मिनाक्षी इंगळे, नेहा खंडाळे, अरूंधती इंगळे, गुरू शिष्य परिवाराचे श्रीहरी उजेड, रवी तारो,गजानन उजेड, मच्छिंद्र पडोळ, योगेश वाघमारे, राम चव्हाण,श्री. दहिवाळ सर, दत्ता घोडे आदींनी परिश्रम घेतले.

या समाजबांधवांचा पुरस्कार देवून सन्मान परीट समाजातील अंत्यविधीसह सर्व सुख दुखाच्या कार्यात हिरीरीने सहभाग
घेवून प्रत्येक कार्यात अग्रभागी असणारे अशोकराव जाधव, सुरेशराव वाघमारे आणि चंद्रकांत घोडके यांचा यावेळी संत गाडगेबाबा पुरस्कार देवून तर मिलींद लांबे यांचा गुरू शिष्य पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. याशिवाय दामोधर वाघमारे, गणेश मेव्हणकर, विनायक इंगळे यांचाही पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *