जालना, प्रतिनिधीः समस्त ब्राह्मण समाज जालना आयोजित भगवान परशुराम जन्मोत्सव 2021 च्या वतीने जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात 40 दात्यांनी रक्तदान केले.
सकाळी मान्यवरांच्या हस्ते भगवान परशुराम प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सकाळी अकरा वाजता जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्यातून रक्तदान शिबीर पार पडले. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष अॅड.विनोद कुलकर्णी यांनी वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमास आ.कैलास गोरंट्याल, नगरसेवक महावीर ढक्का, राजेश राऊत, विलास नाईक, डॉ.प्रकाश सिगेदार,पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, आर.आर.जोशी, दिलीप देशपांडे, शुभांगीताई देशपांडे, विनायक महाराज फुलंब्रीकर, दीपक रणनवरे, अनंत वाघमारे, सुनील जोशी, संजय देशपांडे, शुभम कौडगावकर, अमित कुलकर्णी, गणेश लोखंडे, संकेत मोहिदे, प्रदीप मोहरील, मिलिंद लांबे यांच्यासह समाजबांधवांची उपस्थिती होती.
Leave a Reply