ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कविता व हसऱ्या सुबोध रचना रचनाकार काशिनाथ नथुराम शिंदे(गुरुजी) यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

January 2, 202215:28 PM 46 0 0

उरण -रायगड ( तृप्ती भोईर ) : आज १ जानेवारी रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने काशिनाथ नथुराम शिंदे गुरुजी यांच्या त्यांनी लिहिलेल्या कविता व हसऱ्या सुबोध रचना असलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पेणच्या उपनगराध्यक्षा सौ. वैशाली कडू व पेण नगरपालिका नगरसेवक संजय कडू यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

आज आदरणीय काशिनाथ नथुराम शिंदे (गुरुजी) यांच्या ९२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कविता व हसऱ्या सुबोध रचना या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्याच्या वेळी अगदी साधेपणाने शिंदे गुरुजी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य, चंद्रदर्शन सोसायटीचे सदस्य , यामध्ये पोलिस अधिकारी कांबळे साहेब व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. कांबळे मॅडम, नयन काळण, दिनेश सावंत यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्यावेळी सौ. तृप्ती भोईर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या पुस्तकाचे रचनाकार शिंदे गुरुजी यांनी त्यांच्या या स्वलिखीत रचनांचा जन्म, व्यवहारातील रोजच्या येणाऱ्या प्रसंगातुन, बोलीभाषेतुन , कशा रचल्या गेल्या आहेत, तसेच त्यांच्या काळातील काही घटना, प्रसंग सांगुन एका वेगळ्याच भावविश्वात श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. प्रमुख पाहुण्या सौ. वैशाली कडू यांनी शिंदे गुरुजींना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी दिलेल्या शुभेच्छा, व संजय कडू यांनी शिंदे गुरुजी यांच्यावर केलेली अर्थपूर्ण कविता एका वेगळ्या आशयाकडे घेऊन गेली. पोलिस अधिकारी कांबळे यांनी दिलेल्या शुभेच्छा . शाम भोईर, वैभव शिंदे, राजु शेळके, प्रविण धुमाळ, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत व या साऱ्यांच्या शाब्दीक सुमनांनी कार्यक्रमास रंगत आणली.
कविता व हसऱ्या सुबोध रचनांचे रचनाकार आदरणीय काशिनाथ नथुराम शिंदे (गुरुजी) आहेत व प्रकाशन व संपादकीय जबाबदारी पेलण्याचे कार्य सौ. तृप्ती भोईर यांनी केले. या पुस्तकाचे छपाइचे काम उद्योगपती राजेंद्र शिंदे यांच्या उरण येथील एकविरा मुद्रणालयात करण्यात आले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *