बदनापूर, दि. २४(सा.वा.)-बदनापूर पंचायत समितीचे उपसभापती रविकुमार बोचरे यांनी बुटेगाव येथील महादेव मंदिरासमोर स्वखर्चातून बोअरवेल घेऊन त्यावर सर्व साहित्य बसवून परिसरातील गावकNयांना पाण्याची सोय करून दिली. बुटेगाव येथे ग्रामस्थांना पाण्यासाठी इतरत्र फिरावे लागत असल्याची समस्या होती. या बाबत पंचायत समितीचे उपसभापती रवीकुमार बोचरे यांना माहिती मिळाली.
शासनाकडून मागणी करेपर्यंत उशिर होईल या उददात्त भावनेतून त्यांनी थेट स्वखर्चातून ताडडतोबीने येथे बोअरवेल मशीन बोलावून बोअर घेतला तसेच सर्व साहित्य आणून तो सुरूही केला. त्यांच्या या झटपट कृतीमुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या बोअरवेलच्या उदघाटनप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण हेही उपस्थित होते यावेळी त्यांनी रवीकुमार बोचरे यांच्या कामाचे कौतुक करून त्यांनी शिवसेनेचे ८० टक्के समाजकारण हे तत्व पाळत स्वखर्चातून बोअरवेल उभा करून दिल्याबदद्दल बोचरे यांचे कौतुक करून गावाच्या विकासात राजकारण न करता समाजकारण करण्याचा पायंडा पाडण्याचे आवाहन केले.
Leave a Reply