ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित

November 2, 202112:27 PM 73 0 0

सातारा दि. 1 (विदया निकाळजे ) : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. दि. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधी विविध स्पर्धांचे ही आयोजन करण्यात आले असून मतदारांनी आपल्या मतदानाची नोंदणी करावी, असे आवाहन मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला व तहसिलदार आशा होळकर यांनी केले आहे.

या कार्यक्रमांतर्गत मतदार यादीमध्ये नाव नोंद करणे मतदार यादीतून नाव वगळणे, मतदार यादीतील नाव इतर तपशील याबाबत दुरुस्ती करणे, एकाच विधानसभा मतदार संघातील एका यादी भागातून दुसरे यादी भागांमध्ये मतदार नोंदणी करणे याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी शालेय स्तरावर तसेच महाविद्यालयीन स्तरावर रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाविद्यालयीन स्तरावर नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष कॅम्पचे तसेच तृतीयपंथी, अपंग व महिला यांच्यासाठी विशेष मोहिम या कालावधी मध्ये राबविण्यात येणार आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *