ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बृहन्मुंबई ,नवीमुबई ,व ठाणे आयुक्तालयातून सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग एसीपी कार्यालयास आयएसओ मानांकन

December 17, 202112:53 PM 48 0 0

उरण (संगिता पवार ) :  बृहन्मुंबई ,नवीमुंबई ,व ठाणे आयुक्तालयातून जेएनपीटी पोर्ट विभाग ए सी पी कार्यालयास प्रथम आयएसओ मानांकन मिळाले असल्याने मला आंनद झाझाला आहे . आयएसओ मानांकन मिळणे सोपी गोष्ट नाही ,त्यासाठी बरेच कौशल्य ,लागते आणि ते सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग)सचिन सावंत यांनी चांगले काम केले आहे .ते १४ दिवसांनी सेवेतून निवृत्त होणार आहेत .येणाऱ्या सहाय्यक पोलीस आयुक्त अधिकाऱ्यास सदर चे नवीन कार्यालय सदैव प्रेरणा देत राहील,पुढील काळात जेएनपीटी एसीपी कार्यालयासजागा देण्यास तयार आहे आपल्या सर्वांचे सहकार्याने येथे सुसज्ज इमारत उभी करण्यास आमचे प्रयत्न राहतील ,सर्वांच्या सहकार्यामुळे सर्व काही शक्य झाले आहे ,असे प्रतिपादन नवींमुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय पोर्ट विभाग विस्तारित व नुतनीकरण प्रसंगी केले.

सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय विस्तारित व नुतनीकरण चे उद्घाटन नवीमुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांच्या हस्ते बुधवार ( दि. १५ ) रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय पोर्ट विभाग येथे झाले . नवीमुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग )सचिन सावंत यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले .
या प्रसंगी नवीमुबई पोलीस आयुक्त बिपीन सिंह ,पोलीस सहाय्यक आयुक्त नवीमुबई डॉ. जय जाधव डेप्युटी कमिशनर ( गुन्हे )सुरेश मेंगडे, डेप्युटी कमिशनर( वाहतूक )पुरोशोत्तम कराड ,सीआयएसएफ चे कमांडर विष्णू सहाय ,नवीमुबई परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे ,नवी मुंबई मुख्यालय चे उपायुक्त अभिजित शिवथरे ,पोलीस उपआयुक्त परिमंडळ २ पनवेल चे शिवराज पाटील ,सहाय्यक पोलीसायुक्त (पोर्ट विभाग) सचिन सावंत , माजी आमदार मनोहर भोईर ,राष्ट्रवादी चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील , महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस भावना घाणेकर ,जि प सदस्य विजय भोईर ,कामगार नेते दिनेश पाटील ,कामगारनेते भूषण पाटील ,उरण नगराध्यक्षा सायली म्हात्रे,नरेश कोळी , राष्ट्रवादी चे उरण शहर अध्यक्ष गणेश नलावडे , न्हावाशेवा पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे ,उरण पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनावणे ,,मोरा सागरी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहिते ,पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्र संचालन नितेश पंडीत यांनी केले होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *