ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शेतात काम करणाऱ्या वृद्ध महिलेचा गळा दाबून निर्घृण खून

September 20, 202112:55 PM 7 0 0

बुलढाणा – लोणार तालुक्यातील भुमराळा येथील शेतात काम करणाऱ्या वृद्ध महिलेचा गळा दाबून निर्घृण खून केल्याची घटना भुमराळा येथील गाव शिवारात घडली आहे. दागिनेच्या मोहापायी अज्ञात चोरट्याने हा प्रकार केला असावा असा संशय व्यक्त होत आहे. भुमराळा तालुका लोणार येथील वृद्ध महिला कासाबाई नारायण चौधरी वय 65 वर्ष गावालगतच असलेल्या शेतात कामासाठी गेली होती. सदर महिला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला. दरम्यान, काही नातेवाईक शेतात शोधत असताना सदर महिलेचा मृतदेह आढळून आला.


सदर महिलेच्या अंगावरील दागिने चोरट्यांनी अक्षरशः ओरबडून व कानाचे लचके तोडून बळजबरीने नेले असल्याने दिसून आले. या महिलेच्या शरीरावर जखमेच्या खुणा आहेत या महिलेच्या अंगावर कानातील सोन्याचे रिंग पाच ग्रॅम कानातील सोन्याची फुले एक ग्रॅम हातातील चांदीच्या कडे, पाटल्या, मंगळसूत्र, पोत असे एकूण 56 हजार 500 रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.
सदर घटनेची फिर्याद मृतक महिलेचा नातू मधुकर दत्ता मोरे याने बिबी पोलीस स्टेशनला दिली असता पोलीस स्टेशनचे ठाणेदार एल.डी तावरे व कर्मचारी दिनेश चव्हाण, अरुण सानप, अर्जुन सांगळे, यशवंत जैयवळ, घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे असून पुढील तपास सुरू आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *