नांदेड – जिल्ह्यातील बौद्ध उपासक उपासिका आणि बालक बालिका यांच्या एकूण ५५ जणांनी १ मार्च ते १४ मार्च या कालावधीत बौद्ध स्थळांचे पर्यटन करुन सुखरूप पोहोचलेल्या उपासक उपासिकांचा सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने शहरातील चैतन्य नगरपरिसरातील नालंदा बौद्ध विहार येथे सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे राज्य उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, सहसचिव कैलास धुतराज, जयश्री धुतराज, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर, के.एच. हसनाळकर, निवृत्ती लोणे, आयोजक विजय नरवाडे यांची उपस्थिती होती.
बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, नेपाळ आदी भागांतील बौद्ध पर्यटन स्थळांना जिल्ह्यातील बौद्ध उपासक उपासिका यांनी भेटी देऊन बौद्ध धम्म आणि त्याचा इतिहास जाणून घेतला. त्यात महू, सांची, आंबेडकर पार्क, श्रावस्ती, कपिलवस्तू, लुंबिनी, कंबोडिया बुद्ध विहार, कुशीनगर, वैशाली, गणवाटिका, राजगिरी वेळूवन, नाल़दा, बुद्धगया, दीक्षाभूमी आदी ठिकाणांना भेट देऊन चारिका केली. ठिकठिकाणी बुद्ध वंदना, धम्मदेसना, भोजनदानाचे कार्यक्रम संपन्न झाले. शहरातील नालंदा बुद्ध विहारात झालेल्या कार्यक्रमात कैलास धुतराज यांनी भूमिका मांडली. यावेळी अनेकांनी प्रवासवर्णनपर मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक रणजीत गोणारकर यांनी केले. सूत्रसंचालन नागोराव डोंगरे यांनी केले तर आभार निवृत्ती लोणे यांनी मानले.
Leave a Reply