ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांचा रविवारी सन्मान सोहळा

September 2, 202113:41 PM 50 0 0

जालना (प्रतिनिधी) ः राज्यासह देशभरातील सहकार क्षेत्रासह शैक्षणिक व सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांचा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दि. 5 सप्टेंबर रविवार रोजी बुलढाणा येथे सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासह प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य पतसंस्था फेडरेशनचे खजीनदार दादाराव तुपकर यांनी केले आहे.

बुलढाणा येथील सहकार विद्यामंदीर सांस्कृतीक भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्यास महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीचे प्रमुख आ. संजय रायमुलकर, नागपुर येथील गिरीनार नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे, अकोला येथील निशांत नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आ. रणधीर सावरकर, चिखली येथील तोरणा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष आ. सौ. श्‍वेताताई महाले, चिखलीचे माजी आ. राहुल बोंद्रे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सन्मान सोहळ्याबरोबरच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने प्रशिक्षण शिबीराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते 10.45 या वेळेत आधुनिक तंत्रज्ञान याविषयावर डॉ. मुकेश झंवर, 10.45 ते 11.30 यावेळेत सीए दत्तात्रय खेमनार, 11.30 ते 12.15 यावेळेत बलते बँकिंग व लिक्वीडीटी बेस प्रोटेक्शन फंड या विषयावर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे हे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 12.15 ते 1 यावेळेत सहकार कायदा व पतसंस्था याविषयावर श्याम क्षिरसागर हे मार्गदर्शन करणार असून दुपारी 4 वाजता सन्मान सोहळा पार पडणार आहे. या सन्मान सोहळ्यासह प्रशिक्षण शिबीरास उपस्थितीत राहणाचे आवाहन मल्टिस्टेट पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे, खजीनदार दादाराव तुपकर, उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, महासचिव शांतीलाल शिंगी, कार्याध्यक्ष राजुदास जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुरेखा लबांडे यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *