ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण ते करंजा S T बस सेवा सुरु

October 23, 202114:32 PM 24 0 0

उरण ( संगिता पवार ) हायस्कूल करंजा येथील विद्यार्थ्यांकरिता उरण S T डेपोतुन सकाळी 10 वाजता करंजा करिता बस सेवेचे उदघाटन करण्यात आले .त्याप्रसंगी उरण आगाराचे व्यवस्थापक उदय जुवेकर ,सहाय्यक वाहतूक निरीक्षक नरेंद्र भुंडे ,विद्यालयाचे चेअरमन सिताराम नाखवा, व्हा.चेअरमन के एल कोळी ,मुख्याध्यापक ए टी पाटील सर,पालक ,विद्यार्थिं व शिक्षक वर्ग उपस्थित होता.

सदर सेवेचा लाभ चारफाटा,डाऊर नगर ,मुळेखंड ,गणेश नगर,चाणजे येथील विद्यार्थ्यांना होणार आहे.सदर वेळी चेअरमन सिताराम नाखवा यांनी डेपो व्यवस्थापक उदय जुवेकर यांना विनंती केली की S T
ची सेवा करंजा नाक्यापर्यंत (करंजा धक्का )झाली तर‌ ग्रामस्थ व प्रवासी यांना सुद्धा S T चा लाभ घेता येईल.त्यावेळी त्यांनी सागितले की एस.टी.फिरण्यासाठी जागा उपलब्ध झाल्यास एस.टी.सेवा करंजा धक्या पर्यंत सुरु करता येईल. सध्या तरी कस्टम चाळी पर्यंत एस टी सुरू राहील.या सेवेचा ग्रामस्थांनी सुद्धा लाभ घ्यावा.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *