ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सी. पी. अध्यापक महाविद्यालयात मिशन युवा स्वास्थ अंतर्गत कोरोना लसीकरणास विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

October 30, 202114:16 PM 27 0 0

 शासनाच्या मिशन युवा स्वास्थ योजने अंतर्गत शहरातील रामचंद्र सांस्कृतिक क्रीडा मंडळ जालना संचलित सी. पी. अध्यापक महाविद्यालयात दिनांक २९ ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित केलेल्या एकदिवसीय कोरोना लसीकरण शिबिरास विद्यार्थ्यांचा व परिसरातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. लसीकरण शिबिराचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ दयानंद भक्त यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री प्रतीक भक्त, श्री परख भक्त हे उपस्थित होते. याप्रसंगी मा जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी लसीकरण शिबिराला भेट देऊन लाभार्थी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. युवावर्गाने लसीकरणा बद्दल समाजामध्ये जनजागृती करून आपल्या कुटुंबातील तसेच संपर्कातील सर्वाना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले.


शिबिरामध्ये आरोग्य विभागातर्फे डॉ संगीता राजे मॅडम, जी. जी. खवले, सीमा गवळी, चंद्रकला काकडे, आदित्य कांबळे, सुजाता कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातर्फे प्रा डॉ रत्नाकर कुलकर्णी, प्रा डॉ शाम काबुलीवाले, प्रा. गजानन जगताप, प्राचार्य डॉ पंढरीनाथ कान्हेरे, प्राचार्य प्रदीप शिंगणे, प्राचार्य विजय अदनाक, प्राचार्य राहुल तायडे, प्रा सुनीता राऊत, प्रा कल्पना पाटील, प्रा जगन्नाथ सावंत, प्रा किशोर घोरपडे, प्रा सचिन शिंदे, प्रा सचिन वाघ, प्रा रुपाली शितोळे, प्रा माधुरी बडे, प्रा रामेश्वर मानधना, प्रा अताउल्ला पठाण, प्रा राजेंद्र काळे, श्री जयंत देशमुख, श्री नरेंद्र मुंढे, श्री जाधव, श्री संदीप राठोड, श्री संतोष पाठक, श्री प्रशांत वायकोस, श्री विकास सरोदे, श्रीमती संजीवनी करडकर, श्रीमती सिमा झोटे आदींनी परिश्रम घेतले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *