ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कै. वीर वाजेकर शेठ यांच्या 115 वी जयंतीचे उरण मध्ये आयोजन

July 4, 202216:24 PM 21 0 0

उरण दि. 4 (राघवी ममताबादे) :  मिठागर कामगार यूनियनचे संस्थापक अध्यक्ष, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते कै. वीर वाजेकर शेठ यांची बुधवार दि 6/7/2022 रोजी 115 वी जयंती आहे.

या जयंती निमित्त बुधवार दि 6/7/2022 रोजी सकाळी 10 वाजता उरण पेठा मिठागर कामगार संघ कार्यालय कोटनाका उरण , जि. रायगड येथे ज्येष्ठ मान्यवर, चेअरमेन, संचालक यांच्या उपस्थितीत जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी उरण पेठा मिठागर कामगार संघ, उरण पेठा मिठ उत्पादक सहकारी मंडळ, उरण महाल सहकारी मजूर संघाचे सदस्य पदाधिकारी यांनी तसेच समस्त वाजेकर शेठ प्रेमी यांनी या जयंती महोत्सवास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *