ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सीए प्रिती पारिख देणार आर्थिक साक्षरता चे धडे; रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊन चा उपक्रम

December 20, 202112:01 PM 42 0 0

सीए प्रीती पारीख हे अनील जिंदल वर्ल्ड स्कूल येथे मुलांना आर्थिक साक्षरता संदर्भात सोमवारी दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता मार्गदर्शन करणार आहे. सीए प्रीती पारीख या इंदिरेक्ट टॅक्स कमीटी ऑफ आय. सी .ए .आये चा फॅकल्टी मेंबर असून त्यांनी अनेक ठिकाणी जीएसटीवर व्याख्यान दिलेली आहे .

भारतात ते एक प्रख्यात जीएसटी ट्रेनर म्हणून ओळखले जातात व अनेक राज्यात जसे महाराष्ट्र ,गुजरात ,तमिळनाडू इत्यादी ठिकाणी त्यांनी व्यापारी संघटन साठी मार्गदर्शन केलेले आहे. रोटरी सदस्यांना सुद्धा त्यांनी यापूर्वी मार्गदर्शन केलेले आहे. कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज च्या महिला विभागाच्या त्या सदस्य सुद्धा आहे. त्यांचा मनोदय आहे की प्रत्येक भारतीय नागरिक हा आर्थिक साक्षर झाला पाहिजे व त्यांची ही धारणा आहे की ,लहान मुलांना आर्थिक साक्षरता बद्दल माहिती दिली गेली तर त्यांच्या स्वभावामुळे ते हे ज्ञान त्यांच्या आईवडील आजीआजोबा शेजारी व नातेवाईक यांनासुद्धा देतील व भारत आर्थिक साक्षर होईल. सुलभ ऑनलाईन खरेदी व पेमेंट सिस्टम मुळे लोकांचे आर्थिक नियोजन विस्कळीत होत आहे व मुलांना त्याची जाणीव नसते त्यामुळे हा उपक्रम घेतला जात असल्या बद्दल माहिती रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊन चे अध्यक्ष एडवोकेट महेश धनावत ,सचिव प्रशांत बागडी व प्रोजेक्टर चेअरमन सागर दक्षिनी यांनी दिली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *