ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाचा कायापालट करण्यासाठी विशेष बैठक बोलवा

February 5, 202215:13 PM 35 0 0

जालना (प्रतिनिधी) :  राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा व परिसराच्या सर्वांगीन विकासासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची संयुक्त बैठक आपल्या अध्यक्षतेखाली राज भवनामध्ये घेण्यात यावी अशी आग्रही मागणी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे आणि बुलढाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी आज शुक्रवारी सिंदखेडराजा दौऱ्यावर आलेले राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजाला ऐतिहासीक वारसा लाभलेला असून प्रत्येक वर्षी सिंदखेडराजा येथे संपुर्ण भारतासह विदेशातून देखील अनेक जिजाऊ भक्त येत असतात. मात्र गेल्या अनेक वर्षापासून या भागाचा सर्वांगीन विकास खुंटलेला आहे. राज्याचे मंत्री तथा बुलढाण्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंंगणे आणि बुलढाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी काही महिण्यांपुर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची मुंबई येथे भेट घेवून त्यांना सिंदखेडराजा येथे येण्याचे निमंत्रण दिले होते. त्याअनुषंगाने श्री कोश्‍यारी हे आज शुक्रवारी सिंदखेडराजा येथे आले होते. या दौऱ्यात शिंगणे, ॲड. काझी व इतर पदाधिकाऱ्यांनी कोश्‍यारी यांचे स्वागत करून त्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. सदर निवेदनात म्हटले आहे की, सिदखेडराजा व परिसर विकासासाठी आपल्या अध्यक्षतेखाली राजभवन-मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत सविस्तर आढावा बैठक घेण्यात यावी अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनात राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान सिदखेडराजा जि. बुलडाणा हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत करावे, जालना-खामगांव-शेगांव हा रेल्वे मार्ग (लोहमार्ग) मंजूर करण्यात यावा, पंतप्रधानांनी या ऐतिहासिक स्थळाला भेट द्यावी, आतापर्यंत देशाला लाभलेल्या एकाही पंतप्रधानांनी सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मस्थानास भेट दिलेली नाही. पंतप्रधानांच्या भेटीमुळे इतिहास नाही त्यांच्या येण्याने देशभर या ऐतिहासिक घटनेची सुवर्ण अक्षरांनी नोंद घेतल्या जाईल. एक नवी दिशा मिळेल. त्यामुळे राज्यपालांनी पंतप्रधानांना सिंदखेडराजा येथे भेट देण्यासाठी निमंत्रित करण्याचे प्रयत्न करावेत अशी राज्यातील सर्व शिवभक्तांची तीव्र इच्छा असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *