ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सर्पदंश झाल्यास घ्यावयाची काळजी; काय करावे, काय करु नये…!

July 11, 202215:12 PM 25 0 0

साप म्हटले की, अनेकांच्या भुवया उंचावून मनामध्ये धडकी भरल्याशिवाय रहात नाही. सध्या पावसाळयाचा काळ सुरु असून या काळात मानवी वस्तीमध्ये साप आढळण्याचे प्रमाण अधिक प्रमाणात असते. साप राहत असलेल्या बिळामध्ये पाणी साचल्यामुळे हे साप भक्ष्य मिळविण्यासाठी व लपण्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात. साप चावल्यानंतर नागरिकांनी घाबरुन न जाता खालील गोष्टींची दक्षता घ्यावी.
सर्पदंश झालेला असताना करावयाच्या प्रथमोपचारात काय करु नये
विष चोखण्याचा प्रयत्न करू नका. सर्पदंशाच्या आजुबाजूची जागा कापून काढण्याचा प्रयत्न करु नका. सर्पदंशाच्या जागेला बर्फ लावू नका. सर्पदंशाच्या जागेला कोणतीही वस्तू घासू नका. परिणाम काय होईल किंवा कोणत्या प्रकारचे विष शरीरात घुसले आहे हे माहित नसताना धमनीवर दाब देणाऱ्या यंत्राचा (टुर्जिकेटचा) वापर करु नका. तुम्ही विषनाशक टोचण्यासाठी अर्हताप्राप्त असल्याखेरीज विषनाशकासह कोणतीही बाब शरीरात टोचू नका. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तोंडावाटे काहीही देऊ नका. सर्पदंश झाल्यानंतर ओळखण्यासाठी सर्पाला मारू नका. गावठी उपचारकर्ते, वैदू यांच्याकडून गावठी उपाय किंवा उपचार करून घेऊ नका. या बाबी परिणामकारक नसतात,

सर्पदंश झाल्यास प्रथोमपचारात काय करावे
जर सर्प जवळपास असेल तर त्याने दुसरा दंश करण्याचा धोका कमी व्हावा याकरिता सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तेथून हलवा. शक्य असेल तर सर्पाची जात ओळखा. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला विश्वासात घ्या त्याला शांत ठेवा. सर्पदंश झालेल्या व्यक्तीच्या हालचालीवर निर्बंध घाला. सर्व उपचारास आड येणारे दागदागिने काढून ठेवा घड्याळ, अंगठ्या, ब्रेसलेट इत्यादी काढून ठेवा. अडसर निर्माण करणारे कपडे कापून टाका. काही प्रसंगी क्रिप दाब जखमपट्टी (बँडेज ) वापरण्याचा सल्ला देण्यात येतो. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला आपुलकीची वागणूक द्यावी यामुळे धक्क्याचा धोका कमी होतो. कार्डिओ पलमोनरी रिसुसिएशनसाठी हृदय-फुप्फुस संजीवनासाठी तयार रहा. हवा खेळती ठेवा आणि योग्य वायु योजनाची खात्री करून घ्या. हृदयसंवहनी व काडीओ व्हॅस्कुलर घनता कायम राखा. जर शक्य असेल तर व्यक्तीच्या जीवासंबंधी खुणा- शरीराचे तापमान, नाडीचे ठोके. श्वसनाचा वेग आणि रक्तदाब यांचे संनियंत्रण करावे. जर आघात झाल्याच्या खुणा (निस्तेजता अशा) असतील तर व्यक्तीला आडवे करावे, त्याचा पाय एक फूट वर करावा आणि त्या व्यक्तीला ब्लॅकेटमध्ये गुंडाळावे. विष शरीरात पसरण्याची क्रिया कमी व्हावी याकरिता सर्पदंश झालेला भाग फळकुटी किंवा ओळकंबे बांधून स्थिर ठेवावा.
—जिल्हा माहिती कार्यालय, जालना

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *