ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नागाव ग्रामपंचायत हद्दीत गुरे चोरणारी टोळी सक्रिय

August 10, 202213:50 PM 12 0 0

उरण (संगिता पवार ) : उरण तालुक्यातील नागाव ग्रामपंचायत हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणात गुरे चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे.या संदर्भात उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस यंत्रणा लक्ष केंद्रित करत नसल्याने शेतकरी नागरीकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नागाव ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी महेश म्हात्रे यांनी माहिती देताना सांगितले की नागाव ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी हे शेतीच्या कामासाठी,बैलगाडी साठी व दुध उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात गुरांचे,गाईचे पालन पोषण करत आहोत.परंतु मागील काही महिन्यांपासून रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत अज्ञात व्यक्तींकडून गोठ्यातील पालीव गुरे,गाई चोरीस जाण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.यासंदर्भात उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.तसेच सीसीटीव्ही फुटेज देण्यात आले आहेत.

परंतु पोलीस यंत्रणा लक्ष केंद्रित करत नाहीत.याचा फायदा उठवत सध्या अज्ञात गुरे चोरणाऱ्या टोळीने नागाव ग्रामपंचायत हद्दीत हैदोस घातला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी आता या संदर्भात न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न आम्हा शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा राहिला आहे.एकंदरी पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याने भयभीत व सैरभैर झालेली गुरेढोरे स्वताच्या बचाव करण्यासाठी रहिवाशांच्या रहदारीच्या रस्त्यावरुन सुरक्षित ठिकाण शोधण्यासाठी जात असल्याचे चित्र उरण परिसरात सर्रास पाहायला मिळत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *