ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गणेश विसर्जन करतांना सतर्कता व सावधगिरी बाळगावी

September 18, 202114:36 PM 10 0 0

सध्याच्या परिस्थितीत अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्र जलमग्न झाले आहे.यामुळे नदी-नाले,तलाव,विहीरी या सर्व तुडुंब भरलेल्या आहेत.सध्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात झालेली आहे.त्यामुळे बाप्पाचे विसर्जन करतांना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.त्याचप्रमाणे लहान मुलांना विसर्जन स्थळापासुन दुरच ठेवावे.कारण थोडीशी चुक मोठा आघात करू शकते.कारण खेड्यापाड्यात, शहरात बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी भक्तगण विसर्जनाच्या ठिकाणी जातात.अशा परिस्थितीत कोणताही धोका ओढावून नये याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे.

गणेश विसर्जनासाठी तलावांवर बंदी आहेच तरीही सर्वानी गणेश विसर्जन करतांना सावधगिरी बाळगली पाहिजे.कारण आपण अनेकदा पाहिले व एकले सुध्दा आहे की मुर्ति विसर्जनाच्या वेळेस जिवीत हानी व दुर्घटना सुध्दा झालेल्या आहेत.या संपूर्ण गोष्टी तंतोतंत लक्षात ठेवुन व सतर्कता बाळगुन गणेश विसर्जन केले पाहिजे.त्याचप्रमाणे सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.कारण करोना महामारी पहाता सर्वांनीच सतर्कता व सावधगिरी बाळगुन पुढील पाऊल उचलायला हवे.ज्या-ज्या ठीकाणी कृत्रीम तलाव (आर्टीफीशीयल टॅंक)ची व्यवस्था आहे, त्या-त्या ठिकाणी त्याचा उपयोग सर्वांनीच केला पाहिजे.परंतु ज्या ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था नाही असे भक्तगण नदी किंवा तलावामध्ये गणरायाचे विसर्जन करतात त्या-त्या ठिकाणी सर्वांनीच विसर्जन करतांना सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.मुख्यत्वेकरून मंडळांचे मोठे गणपती असतात.अशा परिस्थितीत मंडळाच्या भक्तांनी गणपती विसर्जन करतांना सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.कारण थोडीशी चुक मोठा आघात पोहचवु शकते याला नाकारता येत नाही.गणेश विसर्जनाच्या निमित्ताने हेच सांगु इच्छितो की सर्वांनीच करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून बाप्पांना निरोप देतांना गणेश विसर्जनाची प्रक्रीया पुर्ण करावी.

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार.
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
मो.नं.9921690779, नागपूर.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *