ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

खारघर शहरामध्ये चक्क खड्ड्यांचे वाढदिवस साजरे

October 19, 202114:24 PM 12 0 0

रायगड/ खारघर (देवयानी कुलकर्णी) :  दिनांक :१७  काल दिनांक १७ रोजी खारघर मधील धोकादायक खड्ड्यांचे चक्क रांगोळी काढून व फुले वाहून खड्डे निदर्शनात आणण्यासाठी वाढदिवस साजरे करण्यात आले. खारघर शहराची आधुनिक” स्मार्ट सिटी” म्हणून ओळख होण्याच्या दृष्टीने नियोजन आखलेले असताना,करदात्यांकडून आर्थिक भुर्दंड लादत व कुठल्याही प्रकारची सुरक्षित,आधुनिक लोकसेवा न देता, सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत, करदात्यांचा पोषण न करता शोषण.. करत असल्याचे अनुभव काही वर्षापासून खारघरकर सहन करीत आहेत. पनवेल महापालिका प्रशासनाने तर सिडकोकडून प्रशासकीय जबाबदारी स्वीकारण्याचे धाडस करत करदात्यांना अतिरिक्त करवाढ करून शोषण करण्याच्या मानसिकतेत साथ देत असल्याचेच चित्र दिसत आहे.

आघाडी सरकारने संबंधित बाबतीत बैठक घेऊन, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली, सिडकोच्या अधिकारी प्रशासकीय योजनांवर अंकूश आणण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेत असल्याचे चित्र सिडको भावना वरील अनेक बैठकीत दिसले. खारघर शहर युवती अध्यक्षा रेणुका पगारे यांनी तर सिडको प्रशासनाला आव्हान करीत असे सांगितले की, करदात्यांकडून ज्या अधिकाराने कर स्वरूपाचे आर्थिक भार घेतात त्याच अनुषंगाने प्रशासनाने करदात्यांना सुरक्षित रस्ते, नियमित पाणी, लाईट,उद्यान अशा प्रकारच्या सेवा द्याव्यात, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस युवती आपल्या आंदोलन व मोर्चा द्वारे आपले हक्क संघर्ष करून मिळवतील. तसेच पनवेल शहर जिल्हा युवती अध्यक्षा प्रज्ञा चव्हाण यांनी सांगितले की, अशा प्रकारचे जनहितार्थ कार्यक्रम सिडको व पनवेल नगरपालिका प्रशासन जोपर्यंत पूर्ण लक्ष देऊन पूर्ण करत नाही व नागरिकांच्या अडचणी पूर्णपणे दूर करीत नाहीत, तोपर्यंत पनवेल महानगर पालिकेच्या प्रत्येक प्रभागांमध्ये अशा प्रकारचे लक्षवेधी कार्यक्रम राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला युवती वर्गाकडून सतत केले जातील.
खड्ड्यांचे बर्थडे म्हणून जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सिडकोचे लक्ष वेधत खारघर राष्ट्रवादी शहर अध्यक्ष बळीराम नेटके यांच्या उपस्थितीत पनवेल जिल्हा युवती पनवेल शहर अध्यक्षा प्रज्ञा चव्हाण यांच्या उपस्थितीत खड्ड्यांचे बर्थडे रांगोळी काढून व पुष्पगुच्छ वाहून साजरे करण्यात आले. त्यावेळी जिल्हा युवक कार्याध्यक्ष शेहबाज पटेल,खारघर शहर युवक अध्यक्ष रेणुका पगारे, पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष आर. एन. यादव, रोजगार व स्वयंरोजगार पनवेल शहर जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी,युवक सचिव पनवेल शहर जिल्हा चांद शेख, खारघर शहर सरचिटणीस संतोष आसवे, खारघर सरचिटणीस मनीष कुळे,युवा कार्यकर्ता असिफ पटेल तसेच राष्ट्रवादी महिला युवती उपाध्यक्ष शैला गवारी, प्रेरणा गावंड खारघर शहर युवती सरचिटणीस तसेच निधी मालविया,चांदणी कामाणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *