ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ओएनजीसी प्लान्ट वतीने वतीने सी एस आर दिवस साजरा

June 10, 202217:15 PM 26 0 0

उरण (संगिता पवार ) : ओ एन जि सी उरण प्लान्ट च्या वतीनेसी एस आर दिवस साजरा करण्यात आला त्या निमित्त उरण येथील जिल्हा परिषद मध्ये शिक्षण घेत असलेले 110 विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नेहरू तारांगण येथे शैक्षणिक सहल घेऊन येण्यात आले होते. या प्संगी ओ एन जि सी चे चे ई डी प्लान्ट मॅनेजर इंद्रजीत गुहा एम जी गौतम , ( जि एम इंचार्ग एच -ई आर) जॉर्ज केर कट्टा , जी एम इन्चार्ज सी एस आर भावना आठवले यांनी हिरवा झेंडा फडकावून CSR दिवसाला सुरुवात केली या प्रसंगी ओ एन जी सी चे अधिकारी वर्ग, सर्व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

वरळी या ठिकाणी नेहरू तारांगण म्हणजे गोलाकार थिएटर आहे.तारांगणाच्या प्रवेशद्वारामधून आत आल्यानंतर सर्वप्रथम ग्रहमाला ची आकृती नजरेस पडते ,तसेच वेगवेगळ्या ग्रहावर तुमचे वजन किती आहे असे दाखवणारे वजनकाटे आकर्षण ठरत आहे.कृत्रिम चंद्र तारांच्या दर्शन घेत असतात. गोल घुमट असलेल्या आकाशगृहात जेव्हा प्रवेश केला तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी आकाश प्रदर्शनाचा आनंद घेत होते,तसेच आकाशातील तारे आणि ग्रह खाली असल्याचे भास होते.पृथ्वीची रचना कश्याप्रकारे आहे ते दाखवण्यात आले हे सर्व मराठी भाषेत होते.
सर्व मुलांना खूप आनंद झाला खूपच खुश होते.सर्वच मुलांनी खूपच मजा केली.कारण ते प्रथमच या ठिकाणी आलेले होते.

नेहरू तारांगण चे संचालक श्री.अरविंद परांजपे यांनी काही विद्यार्थ्यांना फीडबॅक (Feedback) विचारला आणि अजून कोणत्या प्रकारची माहिती या ठिकाणी (नेहरुतारांगण )मध्ये असावी हे मुलांना प्रश्न विचारले

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *