ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जेएनपी बंदरात पर्यावरण दिन उत्साहात साजरा

June 10, 202217:13 PM 30 0 0

उरण(संगिता पवार) : भारतातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे बंदर अर्थात जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) येथे जागतिक पर्यावरण दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पोर्टचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. यांनी जेएनपीए प्रशासन भवन येथे सतत हवा गुणवत्ता मॉनिटरिंग स्टेशन डिस्प्ले बोर्डचे उद्घाटन केले. याप्रसंगी, उपाध्यक्ष श्री उन्मेष शरद वाघ, भा.रा.से. सर्व विभागाध्यक्ष उपस्थित होते. जागतिक पार्यवारण दिनानिमित्त जेएनपीए एसईझेड येथे वृक्षारोपण कार्यक्रमासह इतर अनेक उपक्रम सुरू करण्यात आले.

केंद्रीय बंदरे, जहाजवाहतूक व जलमार्ग मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते जेएनपीएने नुकताच आपला पहिला शाश्वतता अहवाल देखील प्रसिद्ध केला आहे, ज्याच्यातून पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी जेएनपीए करीत असलेले प्रयत्न प्रदर्शित होतात. यावेळी बोलताना, जजेएनपीएचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से., यांनी जेएनपीएने पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, “जेएन पोर्टने पर्यावरण संरक्षणासाठी अनेक प्रकल्प आणि धोरणे हाती घेतली आहेत. आमच्यासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे; पर्यावरणाबाबत जागरूक बंदर म्हणून आमचे प्रयत्न आणि वचनबद्धता दर्शविण्यासाठी आम्ही २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी आमचा पहिला शाश्वतता अहवाल प्रसिद्ध केला आहे. आम्ही आमचा प्रत्येक विकासात्मक प्रकल्प राबवित असताना याची खात्री करतो की तो शाश्वत माध्यमांद्वारे आणि पर्यावरणाच्या समतोल विचारात घेऊन विकसित केला गेला आहे. यावेळी बोलताना त्यांनी असंही सांगितलं की कार्बन फूटप्रिंट्स शक्य तितक्या कमी करणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.”

जेएनपीए मध्ये ‘फक्त एक पृथ्वी’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. जेएनपीएने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि बंदर परिसरात आणि आसपासच्या विविध वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण करण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘पर्यावरण शपथ’ दिली. यावेळी जेएनपीए कर्मचार्‍यांनी ‘फक्त एक पृथ्वी’ संकल्पनेवर पथनाट्यही सादर केले, पथनाट्याच्या माध्यमातून छोट्या छोट्या उपायांद्वारे वसुंधरचे रक्षण करण्याविषयी जनजागृती केली गेली.

जहाजवाहतूक मंत्रालयाच्या हरित बंदर उपक्रमाच्या निर्देशानुसार, जेएन पोर्टने बंदरातील सर्व कामकाजाचा समावेश असणारी कृती योजना तयार केली आहे. बंदर स्तरावर जागतिक हवामान बदलाच्या समस्येचे निराकरण करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, आम्ही “हरित बंदर दर्जा” प्राप्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *