ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 202211:01 AM 20 0 0

सातारा हिरकणी(विदया निकाळजे) ; ‍जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्यावतीने तसेच जिल्हा रुग्णालय, सातारा , इंटरनॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनायझेशन, आर्ट ऑफ लिव्हींग, पतंजली योग , हॅप्पी लाईफ फाँडेशन, सातारा, गाथा योग साधना केंद्र,योग विद्याधाम, सातारा ,गुरुकृपा राजयोग चॅरिटेबल ट्रस्ट, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी नगर स्थान सातारा यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन श्रींमत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे करण्यात आले.


यावेळी उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण जिल्हा आरोग्य अधिकारी ,जि.प. डॉ. राधाकिसन पवार व अतिरिक्त जिल्हा शल्य्‍ चिकित्सक डॉ. सुभाष कदम उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी केले. तसेच आंतरराष्टीय योग दिनाच्या कार्याक्रमामध्ये विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध योग संस्थांचे पदाधिकारी , सदस्य यांनी ऑनलाईन पध्दतीने सहभागी घेतला.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *