उरण(संगिता पवार) रयत शिक्षण संस्थेचे श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्युनिअर कॉलेज जासई विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास विद्यालयाचे चेअरमन श्री.अरुण शेठ जगे,कामगार नेते भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.सुरेश पाटील, मधुकर पाटील, विद्यालयाचे प्राचार्य संस्थेचे लाईफ वर्कर श्री.अरुण घाग,उपमुख्याध्यापक श्री.मोरे पी.पी.,पर्यवेक्षक श्री.साळुंखे आर.एस.,रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष श्री.नुरा शेख यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
विद्यालयातील सर्व सेवकांचा गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य यांची उरण तालुका मुख्याध्यापक संघाच्या खजिनदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल प्राचार्य अरुण घाग यांचा सत्कार करण्यात आला.डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती श्री.म्हात्रे जी.आर.,श्री.शिंदे एस.एस.,व प्राचार्य यांनी सांगितली.श्री.सुरेश पाटील यांनी सर्व शिक्षकांना उद्बोधन केले व शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे चेअरमन यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.मयुरा मॅडमयांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक श्री.मोरे सर यांनी मानले आणि कार्यक्रमाची सांगता केली.
Leave a Reply