ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बी ए ८९-९० गृपचे चौथे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात साजरे

January 11, 202212:07 PM 44 0 1

उरण (तृप्ती भोईर) : रविवार दिनांक ९ जानेवारी २०२२ रोजी स्वामी विवेकानंद आर्टस आणि कॉमर्स‌‌‌ कॉलेज पेण येथील बी ए ८९-९० सालाचे शेवटच्या वर्षाचे माजी विद्यार्थ्यांचे वार्षिक चौथे स्नेहसंमेलन पेण तालुक्यातील कुरमुरली येथील वनगे फार्महाऊसवर मोठ्या उत्साहाने व जल्लोषाने साजरे झाले. बी ए ८९-९० गृपचे हे चौथे स्नेहसंमेलन . कॉलेजमधील ते मंतरलेले दिवस , कॉलेज ची ती टपरी, एकाच बेंचवरील केलेली दंगामस्ती, कॉलेज निवडणूक, आणि तेव्हा झालेली स्नेहसंमेलने या साऱ्या आठवणी पुन्हा नव्याने जागृत करण्यासाठी, ३२ वर्षांपूर्वी चे भुतकाळातील ते सुवर्णक्षण एक दिवस का होईना नव्याने आठवून , आजच्या या धकाधकीच्या जीवनात क्षणभराचा विरंगुळा, मौजमस्ती, गाण्यांच्या भेंड्या, गप्पांचा फड रंगविण्यासाठी हे जमलेली मित्र मैत्रिणींची मांदियाळी स्नेहसंमेलनाचा दिवस उजाडतो कधी आणि एकमेकांची गळाभेट होते कधी या विचारानेच ठरलेल्या ठिकाणी सकाळी १० वाजता हजर झाली.

या सुंदर स्नेहसंमेलनाची सुरुवात बुद्धीची देवता श्रीगणेशाची विधिवत पुजा करुन व त्यानंतर ईशस्तवनाचे गायन करून झाली. नाष्टा झाल्यानंतर भविष्यकाळातील गृपच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम , मैत्री परिवारातील मैत्री दिवसेंदिवस वृध्दिंगत होण्यासाठी प्रयत्न व एकमेकांना दिला जाणारा मैत्री चा हात या विचारांचे मंथन, चर्चा केल्यानंतर सुग्रास दुपारचे भोजन , जेवत असतानाही एकमेकांची केलेली थट्टामस्करी, सार काही कधीही संपू नये आणि त्या घड्याळाच्या काट्याने काही पुढे जाऊच नये असे वाटत असतानाच दुपार सत्र संपले. मग पुन्हा गप्पा गोष्टी, एकमेकांची खेचाखेची व फार्महाऊसवरील जलतरण तलावात पोहण्याचा मनमुराद आनंद लुटुन भैरवीची वेळ कधी झाली हे कुणालाच समजले नाही. आणि मग सगळे भानावर आले संध्याकाळच्या त्या गारव्यात तो आल्याचा चहा घशाला आल्हाद देऊन गेला. एकमेकांना निरोप देण्याची वेळ आली. परतुनी भेटीच्या आणाभाकाही घेतल्या. वाटत होत त्या सुर्यदेवतेने आज थोडावेळ अतिरिक्त भत्ता घेतला असता तर काय झाले असते !!! कोरोना च्या सावटाखाली वावरताना वेळोवेळी जाणीव होत असतानाही एक दिवस हा कॉलेज जीवनातील मैत्रीचा आनंद “भेटीत सुष्टता मोठी ” या गाण्याची सार्थता अनुभवून साजरा केला. बी ए ८९-९० गृपचे हे स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी गृप मधील सर्वंच मित्रं मैत्रीणींनी मेहनत घेतली व या कार्यक्रमात आपला सहभाग दाखवीला.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *