ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

छत्रपती शाहु महाराज यांची जयंती प्रज्ञा करुणा विहार देगावचाळ येथे उत्साहात साजरी.

June 27, 202114:12 PM 25 0 0

नांदेड – आरक्षणाचे जनक छत्रपती शाहु महाराज यांची १४७ वी जयंती प्रज्ञा करुणा विहार देगावचाळ नांदेड येथे उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वजिराबाद पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार व पी.एस.आय. जी.बी.जाधव होते. तर प्रमुख उपस्थिती सेवानिवृत्त उपायुक्त महानगरपालीका प्रकाश येवले, राहुल कोकरे तुपेकर, रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष दीपक सातोरे, साहित्यिक गंगाधर ढवळे, साहित्यिक पांडुरंग कोकुलवार, सौ.अनिताताई संजय नरवाडे, ऍड.आकाश खाडे, सिध्दार्थ कसबे, सुभाष लोखंडे होते.

यावेळी राष्ट्रपाल खाडे सैनिक (भारतीय सैन्य दल) यांच्या वतीने एकूण २०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ‘एक वही व एक पेन’चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पुरुष ज्येष्ठ नागरिक, जळबा थोरात, गौतम येवले, रंगनाथ कांबळे व महिला मंडळाच्या कार्यकर्त्या सौ निर्मलाबाई पंडित, सौ शिल्पा लोखंडे, श्रीमती भारतबाई पंडित उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे संयोजक सुभाष लोखंडे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *