ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

वसुंधरा रिचार्जे करण्यासाठी सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प राबवून अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा

March 12, 202213:01 PM 49 0 0

सातारा हिरकणी(विदया निकाळजे) : दहिवडी प्रांतकार्यालय, हरित वसुंधरा टीम व अष्टभुजा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मा. प्रांताधिकारी श्री शैलेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जगावर आलेले कोरोनाचे संकट ,झालेले दुष्परिणाम आणि पर्यावरणाची वाढती हानी रोखण्यासाठी वृक्षारोपण व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प दहिवडी येथे राबवण्यात आला आहे या उपक्रमात आपले योगदान देणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त यथोचित गुणगौरव करण्यात आला .
कार्यक्रमासाठी टायगर ग्रुप च्या अध्यक्षा कविता चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. जगावर आलेले कोरोनाचे संकट रोखायचे असेल तर वसुंधरा रिचार्जे होण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत व ती जगवली पाहिजेत त्यासाठी रासायनिक खतांचा वापर टाळणे गरजेचे आहे याच संकल्पनेतून सेंद्रीय खत निर्मिती प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे.महिला दिनाचे औचित्य साधून सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पात आपले जास्तीत जास्त योगदान देणाऱ्या महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या तसेच इतर सहभागी महिलांना देखील उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली .महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता झाली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.डॉ.वसुधा कर्णे यांनी केले .कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या टायगर ग्रुप च्या अध्यक्षा कविता चव्हाण यांचा सन्मान अष्टभुजा फौंडेशन च्या अध्यक्षा सौ.विदया निकाळजे यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच कचरा गाडीचे वाहक श्री. देवकुळे, यांचाही याप्रसंगी सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .कार्यक्रम पार पाडण्यासाठी हरित वसुंधरा टीम चे पदाधिकारी श्री. कारंडे ,श्री नंदकुमाखोत,प्रा.श्री.भदाणे , सौ.डॉ.पालवे,सौ.डॉ.बोराटे,सौ.डॉ.डोंबे तसेच इतर काळजीवाहू सदस्य श्री.इंगळे व श्री मतकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *