ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गुरुर्पौर्णिमा सर्वत्र साजरी

July 13, 202216:33 PM 32 0 0

उरण ( संगिता पवार ) : गुरु विना ज्ञान असे सर्वत्र म्हटले जाते त्यामुळे प्रत्येक शिष्य या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूला भेटायला जातात .गुरूंचे मनोभावे दर्शन घेतात .गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरुगुरु मंत्र देतात असे सर्वत्र पहावयास मिळते .गुरु पौर्णिमा बुधवार ( दि. १३ ) रोजी असल्याने सर्व साई बाबा मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो .या दिवशी शिर्डी येथील साई मंदिरात गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

पनवेल तालुक्यातील मानघर येथील श्री स्वामी समर्थमठात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला .सकाळी अभिषेख ,दुपारी पालखी ,दुपारी महा आरती महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ,
उरण परिसरातील मोरा कोळी वाडा ,बोरी ,केगाव ,अंबिका वाडी ,श्री स्वामी समर्थ मठ विनायक ,तेलीपाडा ,मुलेखंड ,आदी ठिकाणी साई बाबा मंदिरात उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
उरण केगाव ग्रामपंचायत हददीतील विनायक कोळी वाडा येथील एक मुखी दत्त मंदिरात भजन महाआरती ,पालखी उत्सव. महाप्रसाद आदींचे आयोजनक रण्यात आले होते हजारो भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला असे मंदिराचे मालक जगदीश कोळी यांनी सांगितले .
श्री स्वामी समर्थ माठ विनायक येथे हि भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.

.उरण शहरातील आनंद नगर येथील श्री स्वामी समर्थ आध्यत्मिक व बाल विकास समाज मंदिर ( दिंडोरी प्रणित ) उरण येथे विविध कार्यक्रमाचे आयोजनकरण्यात आले होते .त्यात सकाळी भूपाळी ,श्री स्वामी समर्थ अभिषेक श्री स्वामी सारामृत वाचन हवन नैवेद्य आरती .,औदुंबर प्रदक्षिणा सायंकाळी नैवेद्य आरती आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी ११.१५ ते रात्री १० पर्यंत गुरु पद देण्यांत आले ,दर्शनास आलेल्यांना प्रसाद म्हणून तिर्थ , केळे व प्रसाद देण्यांत आला . असे सेवेकरी यांनी सांगितले ,

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *