ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण सी आय एस एफ कडून स्थापना दिवस साजरा

March 7, 202214:18 PM 30 0 0

उरण ( संगिता  पवार ) : उरण सी आय एस एफ  युनिट ओएनजीसी – मुंबई यांच्या माध्यमातून ही आय एस एफचा ५३ वा स्थापना दिवस उरण येथे साजरा करण्यात आला.  सी आय एस एफ च्या ५३ व्या स्थापना दिनानिमित्त सी आय एस एफ युनिट लाईन उरण येथे परेडचे आणि गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या समारंभास ग्रुप जनरल मॅनेजर श्री ए.टी. जाधव , हेड  ऑपरेशन्स ओएनजीसी उरण प्लांट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सी आय एस एफ ओएनजीसी मुंबई चे कमांन्डेट श्री ललित शेखर झा यांच्या व्दारे प्रमुख पाहुण्यांचे स्वागत  करण्यात आले. श्री ए.टी. जाधव यांनी सी आय एस एफ  ची देशातील महत्त्वपुर्ण  भूमिका अधोरेखित केली आणि भारतभरातील सर्व महत्त्वाच्या आस्थापनांना सुरक्षित करून राष्ट्र उभारणीत सी आय एस एफ च्या योगदानाचे कौतुक केले आणि या शुभ प्रसंगी सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.  त्यानंतर, सी आय एस एफ जवानांचे कौशल्य दाखविणारे प्रात्यक्षिके दाखविण्यात आले , ज्यात एस टी एफ कमांडोचे रिफ्लेक्स शुटींग डेमो, सी आय एस एफ डॉग डेमो, अग्निशमन प्रात्यक्षिक इत्यादींचा समावेश होता. त्या नंतर सी आय एस एफ सुरक्षा सप्ताह दरम्यान रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, स्लो सायकल स्पर्धा, वृक्षारोपण इत्यादी विविध उपक्रमात सहभागी झालेल्या जवानां च्या परिवारातील  विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *