ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

चीर्ले येथे श्रावणातील मंगळागौरी उत्सव साजरा

August 22, 202212:53 PM 13 0 0

उरण (संगिता पवार ) : श्रावणातील मंगळागौर सर्वत्र साजरा केला जातो .महिला वर्ग सणां निमित्त पारंपारिक विविध आवडीचे खेळ खेळून सण साजरा करतात उरण तालुक्यातील चीर्ले गावातील भाजपा जासई विभाग अध्यक्ष विश्रांती गजाजन घरत यांच्या निवासस्थानी मंगळागौरीचे आगमन झाले होते महिलांनी देवीचे दर्शन घेऊन पारंपारिक खेळ खेळून सण मोठ्या उत्साहात साजरा केला .यंदाचे २० वे वर्ष आहे.

विविधखेळातफुगडी ,नाच ग घुमा ,उखाणा ,आग आग सूनबाई काय म्हणता सासूबाई,कीस बाई कीस दोडका कीस अश्या प्रकारचेखेळ खेळूनआनंद व्यक्त केला , महिलांनी आनंदाने नाच ,गाणी गाऊन सण साजरा केला,देवीची आरती करून सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला , देवी माते सर्वांना सुखी ठेव, सर्वांना आनंदी ठेव सर्वांचे कल्याण कर ,अशी प्रार्थना देवीला करण्यात आली.

या प्रसंगी भाजपा जासई विभाग अध्यक्ष विश्रांती गजाजन घरत भाजपा उरण तालुका महिला सरचिटणीस निर्मला घरत , सिद्धी विनायक महासंघ सदस्या प्रतिमा घरत ,प्राजक्ता घरत ,रुपाली घरत ,रेश्मा ठाकूर ,भावना मढवी ,वैशाली मढवी ,वर्षा घरत ,पल्लवी दळवी ,सरीता मढवी ,सोपान दळवी ,गंगा ठाकूर आदी उपस्थित होत्या .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *