ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७२ वा वर्धापन दिन साजरा

January 28, 202214:18 PM 38 0 0

उरण (संगिता पवार ) भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिना निमित्त बुधवार ( दि २६) जानेवारी रोजी सकाळी ०९.१५ वाजता उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम उरण तहसिलदार प्रांगणात..सर्व शासकीय नियमांचे पालन करून करण्यात आले ..तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी ,राजकीय पक्षाचे कार्यकर्ते ,उरण मेडिकल वेल्फेअर असोशिएशन सर्व सदस्य ,मान्यवर प्रतिष्टीत नागरिक ,आदी उपस्थित होते . कोरोना काळात उरण मेडिकल वेल्फेअर असोशिएशन सर्व सदस्य डॉक्टरांचे उरण चे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. 
उरण नगरपरिषद कार्यालया समोर उरण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष माळी ,यांच्या हस्ते सकाळी ७ .२० वाजता ध्वजारोहण करण्यात आले . उरण नगरपरिषद चे सर्व नगरसेवक ,नगरसेविका ,कर्मचारी आदी उपस्थित होते .त्याच प्रमाणे शाळा ,,समाज मंदिर येथेही ध्वजारोहण करण्यात आले. मोरा येथील ग्राईडवेल नॉर्टन ली .येथे कामगार रमेश पाटील यांच्या हस्ते सकाळी ७.२५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले . या वेळी ग्राईडवेल नॉर्टन ली .चे अॅडमिनिट्रेशन चे मॅनेजर आय .बी ,सिंह व स्टाफ ,कर्मचारी ,कुटुंबिय आदी उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *