जालना :- धरती जनसेवा प्रतिष्ठान रोहनवाडी जालना संचालित, डॉ. वेदप्रकाश पाटील आयुर्वेद महाविद्यालय, ओजस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, ओजस औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, डीजेपी पॉलिटेक्निक, अध्यापक महाविद्यालय, माऊली ग्रंथालय महाविद्यालयामध्ये 72 वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्सवात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी ओजस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी चे प्राचार्य डॉ. कृष्णकुमार सिंग यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गाऊन उपस्थितांची मने जिंकली. डॉ. सुंदर जाधव यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले. यामध्ये भारतीय संविधानाने अनेक जाती, धर्म आणि पंतांना एकत्रित बांधून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्याची जोपासना केलेली आहे असे सांगितले. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री भागवत शिंदे, डॉ विठ्ठल कुचके, प्रा. एल. एस. लोहिया, प्रा. विजय जऱ्हाड, प्रा. सुंदर जाधव,प्रा. पुरुषोत्तम राखुंडे, शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
Leave a Reply