ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भोकरदन नाका मित्रमंडळाच्या वतीने पंधरा ऑगस्ट निमित्त अमृत्त महोत्सव कार्यक्रम साजरा

August 17, 202215:14 PM 10 0 0

जालना (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरातील भोकरदन नाका पोलीस चौकी समोर भोकरदन नाका मित्रमंडळाच्या वतीने 15 ऑगस्ट निमित्त 75 वा अमृत्त महोत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे उपाध्यक्ष भास्करआबा दानवे तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा शहराध्यक्ष राजेश राऊत, बबलु चौधरी, धनराज काबलिये यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे आयोजन बंडू निकाळजे, अफसर भाई, सलिम लोहार, निवास कोड्याल, मोहन गुप्ता आदींनी केले होते. सईद भाया, भगवान ठाकुर, राजु कोड्याल, सुरेशअप्पा, रसुलभाई, विक्रांत सेठ, डॉ. रामफळे, रईस शेख, सरफराज मावली, कटकेअण्णा, बबलुभाई, शेख अतिक, राजेश कांबळे, संजय भालेराव आदींनी परिश्रम घेतले. भोकरदन नाका मित्र मंडळाच्या वतीने शांतीनिकेतन शाळेमध्ये बुंदीचे पाकीट वाटप करण्यात आले. जान्हवी अरविंद रामफळे या विद्यार्थींने राष्ट्रगित गायले. याप्रसंगी भोकरदन नाका पोलीस चौकीचे पोउपनि. काकरवाल यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. सुत्रसंचाल अफसरभाई यांनी केले तर उपस्थितांचे आभार बंडू निकाळजे यांनी मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *