नांदेड – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र, चैत्यभूमीचे शिल्पकार, भारतीय बौध्द महासभेचे आधारस्तंभ, आंबेडकर चळवळीतील झुंजार आणि स्वाभिमानी नेते बौद्धाचार्यांचे जनक, सूर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने सहयोग नगर येथे कविसंमेलन घेऊन जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भंते शिलरत्न, ग्रामीण कवी नागोराव डोंगरे, ज्येष्ठ कवी दु.मो. लोणे, साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, गोविंद बामणे, शरदचंद्र हयातनगरकर, निवृत्ती लोणे, स्तंभलेखिका रुपाली वैद्य वागरे, थोरात बंधू, कवी तथा समीक्षक गंगाधर ढवळे, सिद्धार्थ ढोले, रणजीत गोणारकर, स्वराली वैद्य, सतीश वैद्य यांची उपस्थिती होती.
येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने शहरातील सहयोगनगरस्थित रमाई बुद्ध विहारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात भैय्यासाहेब तथा यशवंतराव भिमराव आंबेडकर यांची १०८ व्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ ग्रामीण कवी नागोराव डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन घेण्यात आले. त्यांनी प्रज्ञा क्रांतीसूर्याचा आला सूर्यपुत्र जन्माला या कवितेने प्रारंभ केला. त्यानंतर दु.मो.लोणे – उचल आसूड, आ.ग.ढवळे- निघाली भिमाची लेक, गोविंद बामणे – पोरा रे, शरदचंद्र हयातनगरकर – कोरोना श्राद्ध, निवृत्ती लोणे – चिरायु होवो, रुपाली वैद्य – रमाई दलितांची आई, थोरात बंधू – जरी बाबा गेला, गंगाधर ढवळे – संस्कार भिमाचे, सिद्धार्थ ढोले – नाही जगाया भिमराया…अशा एकापेक्षा एक सरस कवितांचे सादरीकरण करुन सहभागी कविंनी कविसंमेलनात चांगलीच रंगत आणली.
कविसंमेलनाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करुन आणि धूप व पुष्पपूजन करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बुद्ध, धम्म, संघ वंदनेचा कार्यक्रम झाला. याचना केल्यानंतर भंते शिलरत्न यांनी त्रिसरण पंचशील दिले. कविसंमेलनाचे प्रास्ताविक गंगाधर ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन रणजीत गोणारकर यांनी तर आभार निवृत्ती लोणे यांनी मानले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वी संयोजनासाठी सप्तरंगी साहित्य मंडळाचे पांडूरंग कोकुलवार, कैलास धुतराज, मारोती कदम, शंकर गच्चे, प्रशांत गवळे, बाबुराव पाईकराव, एकनाथ कारलेकर, प्रकाश ढवळे, सुनील नरवाडे यांनी प्रयत्न केले.
Leave a Reply