जालना / प्रतिनिधी जालना शहरातील रामनगर परिसरातील बालाजी नगर येथे सर्वांचे मनोकामना पूर्ण करणारे बालाजी मंदिर आहे.या बालाजीच्या मंदिरात गेल्या 10 वर्षांपासून लग्नाची तिथीत 3 दिवस ब्रमहोत्सव हा अति उत्साहात साजरा केला जातो.या उत्सवात बालाजी मंदिर येथून ढोल ताशांच्या,नृत्याच्या गजरात जालना शहरात पालखी काढली जाते.बालाजी देवाचे लग्न ही या मध्ये लावण्यात येते या मंदिराच्या परिसरात 3 दिवस आनंदाचे वातावरण राहते शेवटच्या दिवशी सर्व भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात .या ब्रमहोत्सवात हजारोच्या संख्येने भाविक या उत्साहाचा आनंद लाभ घेत असतात परंतु देशावर कोरोनाचा संकट आलेले आहे.यामुळे हा आनंदोत्सव शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून हा उत्सव खंडित होऊ नये यासाठी आज दि.7 रोजी अल्प उपस्थितीत भाविक भक्तांनी हा ब्रमहोत्सव मंदिरातच एक दिवसाचाच साजरा केला.या उत्सवानिमित्त देशावरील कोरोनाचे संकट लवकरात लवकर टळो व हा आपला भारत देश हा पुन्हा दरवर्षाप्रमाणे सर्व धर्मियांचे सण उत्सव साजरे करण्यात यावे अशी या जागृत बालाजीच्या उत्सव मध्ये मंदिराचे पुजारी पं. विशाल महाराज त्रिवेदी यांनी प्रार्थना केली.
Leave a Reply