ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नालंदा बुध्द विहारात फाल्गुनी पौर्णिमा उत्साहात साजरी

April 5, 202112:13 PM 26 0 0

जालना (प्रतिनिधी) : येथील नालंदा बुुध्द विहार, संघभुमी नागेवाडी येथे फाल्गुनी पौर्णिमे निमित्त वंदना, सुत्रपाठ व बोधिपुजा चे जायोजन करुन पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पौर्णिमेचे महत्व समजुन सांगताना पू. भदंत धम्मधरजी थेरो म्हणाले की, या पौर्णिमेच्या दिवसीतथागत स्वतः आपल्या जन्मस्थळी कपिलवस्तुला आले. स्वपुत्र राहुल आणि नंदाला दिक्षीत आणि धम्मामध्ये प्रशिक्षीत केले. तसेच यशोधरा व पिता शुध्दोधनाला शील, समाधी, प्रज्ञाचा उपदेश दिला.दरम्यान बुध्दोपदेशाने अनेकांची चित्त निर्मल झाले. याच कारणामुळे फाल्गुनी पौर्णिमेला महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

या मंगल प्रसंगी संडे मेडीटेशन सुध्दा पू. भंते शिवली यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. धम्म जानकार उपासक उपासीकांनी आपापले मनोगत कृतज्ञ म्हणून व्यक्त केले. फाल्गुन पौर्णिमेनिमीत्त अनुत्तर बोधीपुजा संडे मेडीटेशन उपासकांच्या उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमादरम्यान अनेकजन सहपरीवार उपस्थित होते. यावेही हिवाळे, जगताप, बुक्तरे, रत्नपारखे, साळवे, जाधव, खरात, दाभाडे, बनकर, शरणांगत, पठारे आणि गवई यांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *