ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

देगाव चाळ येथील विहारात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी

July 15, 202215:31 PM 24 0 0

नांदेड – शहरातील देगावचाळ परिसरातील प्रज्ञा करुणा विहारात आषाढी पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने भाषण स्पर्धा, काव्य पौर्णिमा, खीर दान, ग्रंथ वाचनास प्रारंभ करण्यात आला. यावेळी सत्यशोधक फाऊंडेशनचे अध्यक्ष कोंडदेव हटकर, अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संसदेचे साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, अॅड. अनिल सदावर्ते, नागराज नवघडे, ग्रंथ वाचक अॅड. मायाताई राजभोज आदींची उपस्थिती होती.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने भाषण स्पर्धा घेण्यात आली. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ वाचनाला सुरुवात करण्यात आली. उपासिका आरतीताई शरद नवघडे यांच्या वतीने खीर दान सर्वांसाठी करण्यात आली. यावेळी उपस्थित प्रज्ञाधर ढवळे, कोंडदेव हटकर या मान्यवरांनी आपले समयोचित मनोगत व्यक्त केले. काव्य पौर्णिमा कार्यक्रमात प्रज्ञाधर ढवळे, कोंडदेव हटकर, संयोजक सुभाष लोखंडे, शोभाबाई गोडबोले, निर्मलाबाई पंडित, शिल्पा लोखंडे, चैत्राबाई चिंतुरे, गिताबाई दिपके, गयाबाई नरवाडे, सुमनबाई वाघमारे यांनी सहभाग नोंदवला‌.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते दीप, धूप आणि पुष्प पूजन करण्यात आले. त्यानंतर त्रीसरण आणि पंचशील पूजापाठ संपन्न झाला.

त्यानंतर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या भाषण स्पर्धेत अनुष्का नवघडे, अस्मिता नवघडे, कोमल हटकर, शितल सुभाष लोखंडे, विजया हटकर, अनुष्का लोणे, अवंती कदम, राहुल कदम, समृद्धी चिंतोरे, अक्षदा नरवाडे, समीक्षा सोनुले, स्वयंदीप गोडबोले आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सुभाष लोखंडे यांनी केले. यावेळी परिसरातील बौद्ध उपासक उपासिका विद्यार्थी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *