उरण (संगीता ढेरे ) रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यु.कॉलेज जासई विद्यालयात महर्षी व्यास मुनी व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करुन गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष व भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश पाटील,माजी सभापती नरेश घरत, यशवंत घरत,मधुकर पाटील, विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग, रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुरा शेख,पर्यवेक्षक साळुंखे सर,सौ.पाटील एस.एस.,सौ.पाटील एस.व्ही.सौ.वाजेकर मॅडम,डी.बी.म्हात्रे,काळे आर टी.सौ.ठाकूर एस.एस.,लेखनिक ठाकूर एस.एम.तसेच विद्यालयातील सर्व सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Leave a Reply