नांदेड – शहरातील प्रज्ञा करुणा विहार देगावचाळ येथे समतानायक महात्मा बसवेश्वर व छ्त्रपती संभाजी राजे यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारिरीक अंतर राखून तसेच शासन निर्देशाप्रमाणे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी साहित्यिक व मुख्याध्यापक गंगाधर ढवळे , रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष दीपक सातोरे, शोभाताई गोडबोले, निरमलाबाई पंडीत, शिल्पा लोखंडे व कार्यक्रमाचे संयोजक सुभाष लोखंडे यांची उपस्थिती होती.
जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या ९१६ व्या जयंतीनिमित्त व छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६४ व्या जयंतीनिमित्त शहरातील पोलिस मुख्यालयानजीक देगाव चाळ स्थित प्रज्ञा करुणा बुद्ध विहारात संयुक्त जयंती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला साहित्यिक गंगाधर ढवळे व रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष दीपक सातोरे यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण केले. तसेच महात्मा बसवेश्वर, छत्रपती संभाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच प्रतिमांचे दीप व धूप पूजन करण्यात आले. त्यानंतर सामुदायिक त्रीसरण पंचशील घेण्यात आले.
सदरील जयंतीचा कार्यक्रम आॅनलाईन पद्धतीने प्रसारित करण्यात आला. यावेळी बोलतांना साहित्यिक गंगाधर ढवळे म्हणाले की, आज म. बसवेश्वर व छ. संभाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम बुद्ध विहारात साजरा होणं ही एक ऐतिहासिक आणि सुवर्णयोगाची घटना आहे. महापुरुषांचे विचार आणि कार्य कर्तृत्व लक्षात घेता आजच्या काळातही ते प्रेरणादायी आणि अनुसरणीय असेच आहेत. परंतु कोरोना महामारीचा काळ इतका घातक, विषारी आणि भयंकर आहे की आपण जगलो तरच असे कार्यक्रम साजरे होतील. मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरे होण्यासाठी आपण एकत्र येणे आवश्यक आहे. पण आज आपल्याला एकत्र येता येत नाही. कोरोनाच्या विरोधात आपल्याला त्याचा नायनाट करूनच युद्ध जिंकायचे आहे. त्यासाठी सर्वांचे लसीकरण झाले पाहिजे. तसेच मास्क, सॅनिटाईझर आणि शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा कायमच काटेकोरपणे अवलंब करावा, निष्काळजीपणाने कुणी वागू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या बौद्ध उपासकांनी घरातच साजरी केली जयंती
देगाव चाळ परिसरातील अनेक बौद्ध उपासक उपासिका यांच्या घरीच म. बसवेश्वर व छ. संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यात राहुल दुधमल, लखन नरवाडे, स्वदीप गोडबोले, हर्षदीप लोखंडे, राजरत्न ढगे, लक्षदीप कोकरे, सिद्धांत थोरात, आर्यन नवघडे, संकेत गायकवाड, संदेश थोरात, राहुल कदम, अनुष्का कदम,शितल लोखंडे,जिया हाटकर,भुषन नरवाडे,विनोद कापुरे,लक्षदीप सदावर्ते, प्रितम सातोरे, प्रविण सातोरे,सोनू गोडबोले आदींनी सहभाग नोंदवला.
आॅनलाईन पद्धतीने सहभाग
ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, पांडूरंग कोकुलवार, कैलास धुतराज, मारोती कदम, शंकर गच्चे प्रशांत गवळे, बाबुराव पाईकराव, रुपाली वैद्य वागरे, रणजीत गोणारकर, भैय्यासाहेब गोडबोले, गोविंद बामणे, प्रकाश ढवळे यांनी सदरील कार्यक्रम आॅनलाईन पद्धतीने प्रसारित करण्यात सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन यांची धुरा सुभाष लोखंडे यांनी सांभाळली.
Leave a Reply