ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोरोनानंतर दोन वर्षांनी महाशिवरात्रीचा उत्सव

March 2, 202216:41 PM 35 0 0

उरण ( संगिता पवार ) उरण कोरोनाच्या निबंधात महाशिवरात्रीनिमित्ताने उरण तालुक्यात दोन वर्षांनंतर बम बम भोलेचे सूर घुमले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील दोन वर्षापासून महाशिवरात्रीचा उत्सव शासनाच्या आदेशाने रद्द करण्यात आला होता. यावर्षी मात्र कोरोनाचे निर्बंध पाळून उरण तालुक्यात महाशिवरात्री साजरी करण्याची शासनाने परवानगी दिली आहे. यामुळे महाशिवरात्रीनिमित्ताने उरण शहर सह ग्रामीण भागात दोन वर्षांनंतर बम बम भोलेचे सूर घुमले . त्यामुळे भाविकांना सर्व ठिकाणी दर्शन घेता आले . घारापुरी बेटावर जाण्यासाठी मोरा बंदरातून बोटी तून भक्तगण जात असताना दिसत होते .

देशात विविध बारा ज्योतिर्लिंगे प्रसिध्द आहेत. घारापुरी बेटावरही पुरातनकालीन चैतन्यमय आणि संजीव भासणारी बारा शिवलिंग अस्तित्वात आहेत. महाशिवरात्रीनिमित्ताने बेटावरील या शिवलिंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक आणि शिवभक्त येतात. त्यामुळे घारापुरी बेटावरील महाशिवरात्रीला जागतिक महाशिवरात्री म्हणूनही ओळखली जाते. मुंबईपासून ११ किमी अंतरावर असलेले घारापुरी बेट सहाव्या शतकातील आहेत. प्राचीन शिवकालीन लेण्यांमुळे कायम जागतिक प्रसिद्धीच्या झोतात राहिले घारापुरी बेटावरील लेणी.
आहे. काळ्या पाषाणात शिवाची विविध रूपे असलेली अनेक प्रचंड शिल्पमोठ्या खुबीने कोरलेल्या शिल्पांमध्ये अर्धनारीश्वर शिव,घारापुरीत लेण्यांसह शिवलिंगाचे वेगळेपणराज्यभरात काही ठिकाणी असलेल्या शैवलेण्यांपेक्षा घारापुरी येथील लेण्या अगदी वेगळेपण दर्शवितात. लेण्याच्या गाभाऱ्यातच प्रचंड आकाराची पुरातन कालीन शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या चारही बाजुला असलेल्या प्रवेशव्दावरच प्रचंड आकाराचे व्दारपाल तैनात आहेत. प्रचंड आकार आणि घेराचे शिवलिंग सर्वाचिच लक्ष वेधुन घेते,
उरणतालुक्यातील घारापुरी ,, माणकेश्वर ,उरण रेल्वे स्टेशन ,देऊळवाडी ,बोरी गावं , जे एन पी टी ,जासई आदी ठिकाणी भाविकांनी जाऊन शिव लिंगाचे दर्शन घेतले

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *