उरण -रायगड ( तृप्ती भोईर ) : गेली दोन वर्षे आपण पहातोय, अनुभवतोय कोरोना महामारीचा हाहाकार फक्त जीवीताच्या सुरक्षीततेसाठी सरकारने घालून दिलेले नियम पाळत व या रोगाला सामोरे जाण्यासाठी सामाजिक अंतर, सॅनिटायझर व मास्क या त्रीसुत्रीचे पालन करून जनजीवन काही अंशी सुरळीत होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या काहीप्रमाणात कमी आल्याने महाराष्ट्र शासनाने कोरोना प्रतीबंधक नियम शिथिल करून सर्व मंदिरे उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे जनमानसात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे . पनवेल आणि उरण नजीकच असलेल्या विंधणे या ठिकाणी अगदी नव्याने साकारत असलेल्या तीर्थधाम मंदिराचा शिखर पूजन सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा झाला. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे तीर्थक्षेत्र पंढरपूर ,गाणगापूर ,शिर्डी अशा तीर्थयात्रेस जाण्यासाठी सर्वच सामान्य माणसांस शक्य होत नाही .त्यामुळे एकाच ठिकाणी सर्वच देवदेवतांचे दर्शन होईल या उद्देशाने हे तीर्थधाम मंदिर उभारले जात आहे.
या तीर्थधाम मंदिराच्या शिखर पुजन सोहळ्यासाठी पनवेल, उरण नवीमुंबई येथील आबालवृद्धांनी उपस्थित राहून त्यांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.
Leave a Reply