ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे द्रोणागिरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव साजरा

February 20, 202215:02 PM 32 0 0

उरण दि 19(राघवी ममताबादे ) : दुर्ग मावळा प्रतिष्ठान या गड किल्ल्याचे संवर्धन, संरक्षण करणाऱ्या संस्थेतर्फे उरण तालुक्यातील एतिहासिक द्रोणागिरी किल्ल्यावर शिवजयंती निमित्त शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.18, 19 फेब्रुवारी 2022 असे दोन दिवस शिवजन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था, सह्याद्री प्रतिष्ठान उरण विभाग, शिवभक्त प्रतिष्ठान उरण विभाग, शिवशक्ती मित्र मंडळ उरण चारफाटा, योगा विथ पूनम ग्रुप, यान्सी ग्रुप ऑफ लिव्हीस टीम, युवा शिवशक्ती मित्र मंडळ डाऊरनगर, शिवछत्रपती मित्र मंडळ करंजा, अवनी सामाजिक संस्था उरण, डाऊर नगर ग्रामस्थ आणि मित्र परिवार आदी संस्थेचे पदाधिकारी सदस्य या शिवजनमोत्सवात सहभागी झाले होते.
शुक्रवार 18 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 2 वाजता द्रोणागिरी गडाची साफसफाई करण्यात आली , सायंकाळी 5 वा.सर्व शिवभक्त गडावरील कुंडातील पाणी घेऊन खाली उतरले , सायंकाळी 7 वा. विमला तलाव उरण शहर यथे महाराजांच्या मूर्तीला अभ्यंग स्नान घातले.सायंकाळी 8 ते 9:30 दरम्यान द्रोणागिरी गडाबद्दल माहिती आणि इतिहास वर्णन, विमला तलाव येथे दीपोत्सव असे कार्यक्रम घेण्यात आले. 19 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 वा. बाळ शिवाजी राजांचा पाळणा हलविण्यात आला.शिवप्रतिमा पूजन, द्रोणागिरी किल्ल्यावर शिव राज्याभिषेक, दुर्ग पूजन, पोवाडा, व्याख्यान, मान्यवरांचे स्वागत व शिवभोजन असे उपक्रम पार पडले.सायंकाळी 5 वा. गडावरून सर्वजण खाली उतरले.6 वा. निरोप समारंभ झाला. यावेळी सर्वांचे आभार मानण्यात आले. एकंदरीत दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान व सर्व सहभागी संस्था, संघटनांनी विशेष मेहनत घेतली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *