ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नियोजीत पद्धतीनेच सिमेंट रस्त्याचे बांधकाम व्हावे : ॲड. महेश धन्नावत

December 4, 202114:20 PM 46 0 0

जालना प्रतिनिधी : जालना शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते माँ साहेब जिजामाता चौक तसेच श्री गुरुगणेश भवन ते गुरुबच्चन चौक येथे सिमेंट रस्त्याचे बांधकाम एकाचवेळी सुरु आहे, त्यामुळे लोकांना पर्यायी मार्ग राहिलेला नाही तसेच एकीकडे मुर्तीवेस ढासळ्याने सुद्धा तो मार्ग बंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते माँ साहेब जिजामाता चौक या रस्त्याचे दोन्ही बाजु चे कार्य एकाचवेळी करत असल्याने लोकांना वाहतूकीसाठी अडचण निर्माण झालेली आहे. तसेच बांधकाम गुत्तेदारांनी नियमाप्रमाणे तेथे कोणतेही फलक सुद्धा लावलेले नाही, की रस्ता खोदण्यासंदर्भात त्याला कधी परवानगी मिळाली तसेच काम किती दिवसात पूर्ण होईल व एकाच वेळी सर्व रस्ते खोदुन ठेवल्याने पर्यायी मार्ग लोकांकडे राहिलेला नाही व त्यांची गैरसोय होत आहे. मा. मुख्याधिकारी नगर परिषद जालना यांनी दुर्लक्ष केल्यानेच हा प्रकार घडत आहे.

कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा मॅडम यांच्या प्रयत्नातून व आमदार साहेब यांच्या सहकार्याने आज चोहीकडे विकासकामे होत आहे. मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यामध्ये नियोजनाचे आभाव असल्याने लोकांची गैरसोय होत असल्याने भविष्यात असे होवु नये म्हणून अॅड. महेश धन्नावत यांनी निवेदनाद्वारे मा. मुख्याधिकारी नगर परिषद जालना व मा. जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे निवेदनाद्वारे विनंती केली आहे व रस्त्याचे काम कधी पूर्ण होईल याबाबत फलक लावणे बाबत सुद्धा विनंती निवेदनात केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *