ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

केंद्रप्रमुखा अनघा चौलकर यांचा सेवापूर्ती  सत्कार सोहळा संपन्न

April 6, 202212:15 PM 41 0 0

मुरुड जंजिरा ( नैनिता नरेश कर्णिक ) : नगरपरिषद मुरुड जंजिरा  शाळेतील  नगरपरिषद मुरुड शाळा क्रमांक २ च्या शाळा प्रमुख तथा केंद्रप्रमुखा अनघा चौलकर बाई यांचा सेवापूर्ती  सत्कार सोहळा नगरपरिषद शाळा क्रमांक ४ मध्ये सन्माननीय प्रशासनाधिकारी दिपाली दिवेकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

प्रथम सायली गुंजाळ यांनी चौलकर  बाईं यांचा नोकरीत लागल्याचा कालावधी एकूण सेवाकाल नमुद केला. नगरपरिषद  शाळा क्रमांक १ शाळा प्रमुख तथा नवनिर्वाचित  केंद्रप्रमुख राजेश भोईर,  शाळा क्रमांक ३ शाळा प्रमुख कलपना पेणकर , शाळा क्रमांक ४शाळा प्रमुख राजश्री गजने , शाळा क्रमांक ५ शाळा प्रमुख आरती थोरवे , सेवानिवृत्त मुख्याध्यापिका नैनिता  कर्णिक , सुजाता जंजिरकर  अमिता भगत, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख  सुधीर  नागे, राशीद फईम,प्रमोद सुभेदार, मनिषा फाटक, महेंद्र हावरे सर ,यांनी  चौलकर बाईंचा मनमिळाऊ  स्वभाव,जिद्द, चिकाटी वेगवेगळ्या  उपक्रमांद्वारे शिक्षक,पालक  विद्यार्थी यांचा साधलेला समन्वय,नृत्यकला,सुंदर हस्ताक्षर, सहलीचे उत्तम नियोजन, तल्लख  बुद्धीमत्ता ,काम करण्याची धडपड,शाळेवरोबर कुटुंबाची जबाब दारी  उत्तमरितीने पूर्ण केली.  .थोडक्यात अष्टपैलू गुणांविषयी उदाहरणाद्वारे निदर्शनास आणून दिले.

सेवापूर्ती अनघा  चौलकर  बाई यांनी आपल्या  मनोगतात बालपणीची आठवणींना  उजाळा  देताना व त्या वेळी  ज्यांनी सहकार्य केले त्यांचे बद्दल कृतज्ञता  व्यक्त केली.तसेच  शाळेतील शिक्षकांना सहकार्याबद्दल  धन्यवाद दिले.व सर्व उपस्थितांना  भेटवस्तू म्हणून चाफ्याची झाडे देण्यात आली. अध्यक्षीय भाषणात मा प्रशासनाधिकारी दिपाली दिवेकर मॅडम यांनी बाईंच्या शैक्षणिक कार्याबद्दल आदरयुक्त भावना व्यक्त करून तुम्ही  कधीही म्हाता-या न होता चिरकाल तरूण रहा असे सांगून  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  राकेश कौलकर, संध्या नागे, मंगल मुनेकर शिंदे , अविनाश ठाकुर दिनेश भोईर यांनी मोलाचे सहकार्य केले.  नवनिर्वाचित केंद्रप्रमुख राजेश  भोईर   यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून अल्पोपहार नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *