ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

केंद्रस्तरीय शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न

March 16, 202214:40 PM 38 0 0

मुरुड जंजिरा (प्रतिनिधी,सौ नैनिता कर्णिक) : मुरुड जंजिरा नगरपरिषद शाळा क्रमांक ४ मध्ये शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी मान्यवर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दामोदर खरगावक़र ,रोहिणी सावकार, उमेश बैकर,आशिल ठाकुर,सुप्रीया रहाटे ,केंद्रप्रमुख अनघा चौलकर प्रशिक्षक राजश्री गजने,महेंद्र हावरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.
मान्यवर व सर्व नगरपरिषद शाळांच्या व्यवस्थापन समिती सदस्य (प्रशिक्षणार्थी ) सर्व शाळाचे मुख्याध्यापक राजेश भोईर, अनघा चौलकर,कल्पना पेणकर , राजश्री गजने, आरती थोरवे ,खलीदा नाखुदा या सर्व उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन शब्द सुमनाने स्वागत केले. तज्ज्ञ मार्गदर्शक राजश्री गजने मॅडम व महेंद्र हावरे सर यांनी शाळा व्यवस्थापन समिती पुर्नगठन व्यवस्थापन समितीची कर्तव्य आणि जबाबदारी,या विषयाअंतर्गत शासनाच्या विद्यार्थ्यांना मिळणा-या योजनेत असणा-या बाबी ,बालकांचे हक्क व संरक्षण,शाळा विकास आराखडा,शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण आपत्ती व्यवस्थापन या विषयीचे उदाहरणासह उत्तमप्रकारे मार्गदर्शन केले.
तद्नंतर व्यवस्थापन समिती सदस्यां कडून शाळेबाबत आपल्या ज्या अपेक्षा असतील त्या लिहून घेण्यात आल्या. यावर चर्चा करण्यात आली. चर्चत राजेश भोईर सर,महेंद्र हावरे सर आशील ठाकुर,सुप्रीया रहाटे यांनी आपापले विचार व्यक्त केले. समस्या सोडविण्यासाठी जर पालकांचे सहकार्य जास्त मिळाल्यास शाळेच्या असणा-या समस्याचे निराकरण लवकरच होण्याची शक्यता मिळेळ असे निदर्शनास आणून दिले. याच बरोबर आपण आपल्या मराठी शाळा टिकणे किती गरजेचे आहे या विषयी प्रतिपादन करण्यात आले. केंद्रस्तरीय प्रशिक्षण दिनांक १४/०३/ २०२२ ते १५ /०३/ २०२२ या दोन दिवसाच्या कालावधीत खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न झाले. सौ संध्या नागे बाई यांनी सर्व उप स्थितांचे मनःपूर्वक आभार मानून दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *